bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Joshua 8
Joshua 8
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 9 →
1
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “भिऊ नकोस, कचरू नकोस; ऊठ, सर्व योद्धे बरोबर घेऊन आय नगरास जा. पाहा, आय नगराचा राजा, त्याची प्रजा, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे;
2
यरीहो आणि त्याचा राजा ह्यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा ह्यांचे कर; मात्र तेथील हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपल्यासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव.”
3
त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठवले.
4
त्याने त्यांना अशी आज्ञा केली की, “ऐका, नगराच्या पिछाडीस जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा.
5
मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ, आणि ते पूर्वीप्रमाणे आमच्यावर हल्ला करायला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासमोरून पळू लागू.
6
आम्ही त्यांना चाळवत चाळवत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील; कारण त्यांना वाटेल, पूर्वीप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळू लागू;
7
मग तुम्ही दबा धरणार्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे.
8
तुम्ही ते नगर हस्तगत केल्यावर त्याला आग लावा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करा; मी तुम्हांला आज्ञा केली आहे.”
9
मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकां-बरोबरच राहिला.
10
यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोक जमवले. तो व इस्राएलाचे वडील जन लोकांच्या आघाडीवर आय नगराकडे निघाले.
11
त्यांच्याबरोबर सर्व योद्धे चढाई करायला गेले, आणि आय नगराजवळ पोहचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला; ते व आय नगर ह्यांच्यामध्ये एक खोरे होते.
12
त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरायला ठेवले.
13
ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जायचे आणि पश्चिमेस कोणी दबा धरायचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री खोर्यात राहिला.
14
आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील उताराकडे गेले, पण नगराच्या पिछाडीस लोक आपणांवर दबा धरून आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते.
15
मग यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर मोड झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळू लागले.
16
त्यांचा पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करत नगरापासून दूरवर गेले.
17
इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा एकही पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर मोकळे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला.
18
तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुझ्या हाती असलेली बरची आय नगराकडे उगार. कारण ते मी तुझ्या हाती देईन.” त्याप्रमाणे यहोशवाने आपल्या हाती असलेली बरची नगराकडे उगारली.
19
त्याने आपला हात उगारताच दबा धरणार्यांनी लगबगीने उठून धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले आणि लगेच नगराला आग लावली.
20
आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तो नगराचा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे पळण्याची ताकद राहिली नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणार्यांवर उलटले.
21
दबा धरणार्यांनी नगर हस्तगत केल्याचे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्राएलाने पाहिले तेव्हा ते मागे उलटून आयकरांवर तुटून पडले.
22
त्यांच्याशी सामना करायला ती दुसरी टोळीही नगरातून निघाली; असे ते दोहो बाजूंनी इस्राएलाच्या कचाट्यात सापडले; इस्राएलाने त्यांचा संहार केला; त्यांच्यातला कोणी जिवंत राहिला नाही किंवा निसटून गेला नाही.
23
आय नगराच्या राजाला त्यांनी जिवंत धरून यहोशवाकडे आणले.
24
ज्या मोकळ्या रानात इस्राएलांनी आयकरांचा पाठलाग केला होता तेथे त्यांनी त्या सर्वांची कत्तल केली आणि त्यांचा तलवारीने साफ फडशा उडवला; त्यानंतर सर्व इस्राएल आय नगरात परत आले व त्यावरही त्यांनी तलवार चालवली.
25
त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली. ते सर्व स्त्रीपुरुष मिळून बारा हजार होते.
26
आय येथील सर्व रहिवाशांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही.
27
परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरातली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली.
28
तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला; आजपर्यंत तो तसाच आहे.
29
आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून उतरवून नगराच्या वेशीजवळ टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली; ती आजपर्यंत आहे.
30
मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;
31
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने इस्राएल लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे, अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली; त्या दगडांना लोखंडाचा स्पर्शदेखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अर्पण केले आणि शांत्यर्पणे वाहिली.
32
तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने त्या दगडांवर मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहून काढली.
33
परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणार्या लेवीय याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अंमलदार आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरे हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरिज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले.
34
त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथांत लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने त्याने वाचून दाखवली.
35
इस्राएलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरे ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या; त्यांतला एकही शब्द त्याने गाळला नाही.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24