bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Judges 11
Judges 11
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 12 →
1
इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता; तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता.
2
गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले; हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, “तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही.” असे म्हणून त्यांनी त्याला हाकून दिले.
3
तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले.
4
काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी युद्ध पुकारले.
5
अम्मोनी लोक इस्राएलाशी लढू लागले तेव्हा गिलाद येथील वडील जन इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले.
6
ते इफ्ताहाला म्हणाले, “चला, आमचे सेनापती व्हा म्हणजे आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करू.”
7
इफ्ताह गिलादाच्या वडील जनांना म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष करून मला आपल्या बापाच्या घरातून हाकून दिले होते ना? आणि आता कशाला आलात? संकटात पडलात म्हणून?”
8
गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “होय, म्हणून तर आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर चला, आणि अम्मोनी लोकाशी युद्ध करा, म्हणजे तुम्ही आम्हा सर्व गिलादकरांचे प्रमुख व्हाल.”
9
गिलादाच्या वडील जनांना इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोकांशी युद्ध करायला तुम्ही मला स्वदेशी परतवले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय?”
10
गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “परमेश्वर तुमच्या-आमच्यामध्ये साक्षी आहे; तुम्ही म्हणता तसे आम्ही अवश्य करू.”
11
मग इफ्ताह गिलादाच्या वडील जनांबरोबर गेला; लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले. तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वरासमक्ष परत बोलून दाखवले.
12
पुढे इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे जासूद पाठवून विचारले, “माझ्याकडे यायला व माझ्या देशाशी लढायला तुझे आणि माझे कोठे बिनसले आहे?”
13
अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या जासुदांना म्हटले, “इस्राएल लोक मिसर देशाहून आले तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक व यार्देन ह्या नद्यांपर्यंतचा माझा प्रदेश त्यांनी हिरावून घेतला; आता तो मुकाट्याने परत करा.”
14
इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे पुन्हा जासुदांच्या हाती निरोप पाठवला, तो असा:
15
इफ्ताह म्हणतो, “इस्राएलाने मवाबाचा देश घेतला नाही किंवा अम्मोनी लोकांचाही देश घेतला नाही,
16
पण ते मिसर देशाहून निघाले आणि रानातून कूच करून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले;
17
तेव्हा त्यांनी जासुदांच्या हाती अदोमाच्या राजाला सांगून पाठवले की, कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून जाऊ दे; पण अदोमाच्या राजाने आमचे ऐकले नाही; तसेच त्यांनी मवाबाच्या राजाला सांगून पाठवले, पण तोही आमचे ऐकायला तयार नव्हता, म्हणून इस्राएल कादेश येथे वस्ती करून राहिले.
18
त्यानंतर त्यांनी रानातून फिरत फिरत अदोम व मवाब ह्या देशांना वळसा घालून मवाबाच्या पूर्वेकडून येऊन आर्णोन नदीपलीकडे तळ दिला. पण ते मवाबाच्या हद्दीत शिरले नाहीत; कारण आर्णोन नदी ही मवाबांची सरहद्द होती.
19
मग अमोर्यांचा राजा, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन, ह्याच्याकडे इस्राएलांनी जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, ‘कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून स्वस्थानी जाऊ दे.’
20
पण सीहोनाला इस्राएलाची खात्री नसल्यामुळे त्याने त्याला आपल्या हद्दीतून जाऊ दिले नाही; उलट त्याने आपले सर्व लोक जमवून याहस येथे तळ देऊन इस्राएलाशी युद्ध केले.
21
तरीपण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी त्यांचा पराभव केला. अशा प्रकारे त्या देशाचे रहिवासी अमोरी ह्यांचा सारा मुलुख इस्राएलांनी हस्तगत केला.
22
अर्थात आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंतचा आणि रानापासून यार्देन नदीपर्यंतचा अमोर्यांचा सर्व देश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला.
23
इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपली प्रजा इस्राएल हिच्याकरता अमोर्यांना घालवून दिले आणि आता तू त्यांच्या प्रदेशावर हक्क गाजवायला बघतोस काय?
24
तुझा देव कमोश ह्याने तुला दिलेल्या वतनावरच तू हक्क गाजवू नये काय? आमचा देव परमेश्वर ह्याने ज्यांना आमच्यासाठी हाकून लावले त्यांचे वतन आमचेच राहील.
25
मवाबाचा राजा सिप्पोर ह्याचा मुलगा बालाक ह्याच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? तो इस्राएलाशी कधी भांडला काय? तो कधी लढला काय?
26
हेशबोन व त्याची उपनगरे, अरोएर व त्याची उपनगरे आणि आर्णोनतीरीची सर्व नगरे ह्यांत आज तीनशे वर्षे इस्राएल वस्ती करून आहे, तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत?
27
मी तुझा काही गुन्हा केला नाही, तरी माझ्याशी लढून तू माझ्यावर अन्याय करत आहेस, न्यायाधीश परमेश्वर हा इस्राएल लोक व अम्मोनी लोक ह्यांचा आज न्याय करो.”
28
इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाला पाठवलेला हा निरोप त्याने जुमानला नाही.
29
मग इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला आणि इफ्ताह गिलाद व मनश्शे ह्या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पे येथे आला आणि गिलादी मिस्पे येथून कूच करून अम्मोनी लोकांवर चालून गेला.
30
इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की, “तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस,
31
तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन.”
32
मग अम्मोनी लोकांशी युद्ध करायला इफ्ताह त्यांच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले.
33
अरोएरापासून मिन्नीथपर्यंतच्या वीस नगरांत आणि पुढे आबेल करामीमपर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्यांचा मोड केला. अशा प्रकारे इस्राएल लोकांनी अम्मोनी लोकांचा नक्षा उतरवला.
34
इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवत व नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा किंवा मुलगी नव्हती.
35
तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, “हाय! हाय! मुली, तू माझे मन खचवले आहेस; तू माझ्यावर मोठे संकट आणले आहेस; परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.”
36
ती त्याला म्हणाली, “बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणेच माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे.”
37
ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, “मात्र माझ्यासाठी एवढे करा की मला दोन महिन्यांचा अवधी द्या म्हणजे मी आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीन.”
38
तो म्हणाला, “जा.” आणि त्याने तिला दोन महिन्यांसाठी पाठवून दिले. मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करत राहिली.
39
दोन महिन्यांनंतर ती आपल्या बापाकडे परतली. तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिच्याबाबत केले. तिचा पुरुषाशी शरीरसंबंध झाला नव्हता.
40
ह्यावरून इस्राएल लोकांत अशी चाल पडली की, इस्राएल मुलींनी इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात जावे.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21