bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Judges 17
Judges 17
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 18 →
1
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नावाचा एक मनुष्य राहत होता.
2
तो आपल्या आईला म्हणाला, “जी अकराशे चांदीची नाणी तुझ्यापासून हिरावून नेल्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस ते पैसे माझ्याकडे आहेत. मीच ते घेतले होते.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “बाळा, परमेश्वर तुझे कल्याण करो.”
3
त्याने ती अकराशे चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली, “माझ्या मुलाच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत. ह्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते.”
4
त्याने ते पैसे आपल्या आईला परत केले. तेव्हा तिने त्यांतली दोनशे नाणी सोनाराला दिली, आणि त्याने त्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती तयार केली; त्या मूर्ती मीखाच्या घरात ठेवण्यात आल्या.
5
ह्या मीखाचे एक देवघर होते. त्याने एक एफोद आणि काही तेराफीम (कुलदेवतेची मूर्ती) तयार केल्या व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले.
6
त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता; जो तो आपल्याला योग्य दिसेल तसे करत असे.
7
बेथलेहेम-यहूदा येथे यहूदा घराण्यातला एक तरुण लेवी उपरा म्हणून राहत होता.
8
आपल्याला कोठेतरी राहायला जागा मिळाली तर पाहावे म्हणून तो यहूदातील बेथलेहेम नगर सोडून निघाला; आणि प्रवास करत करत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरी आला.
9
मीखाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” त्याने उत्तर दिले, “यहूदाच्या बेथलेहेमातला मी एक लेवी आहे; आसरा मिळेल तेथे जाऊन राहावे म्हणून मी फिरत आहे.”
10
मीखा त्याला म्हणाला, “माझ्या येथे राहा. तू माझ्या वडिलासमान हो व पुरोहित म्हणून राहा. मी तुला प्रतिवर्षी दहा चांदीची नाणी व एक पोशाख देईन आणि तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करीन.”
11
मग तो लेवी त्या माणसाबरोबर राहायला तयार झाला; त्याने त्या तरुणाला आपल्या मुलाप्रमाणे वागवले.
12
मीखाने त्या तरुण लेवीला दीक्षा दिली आणि तो त्याचा पुरोहित होऊन त्याच्या घरी राहू लागला.
13
मग मीखा म्हणाला, “मी एक लेवी आपला पुरोहित करून ठेवल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील अशी मला आता खात्री आहे.”
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 18 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21