bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Judges 4
Judges 4
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 5 →
1
एहूद मृत्यू पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले.
2
तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.
3
त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला.
4
त्या वेळेस लप्पिदोथाची बायको दबोरा संदेष्ट्री ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.
5
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल ह्यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत.
6
तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?
7
तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.”
8
बाराक तिला म्हणाला, “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही.”
9
ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
10
बाराकाने जबुलून व नफताली ह्यांना केदेश येथे बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.
11
मोशेचा सासरा1 होबाब ह्याचे वंशज जे केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता.
12
इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,
13
तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशे लोखंडी रथ आणि हरोशेथ-गोयीम येथून आपल्याजवळचे सर्व लोक कीशोन नदीवर जमा केले.
14
दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून उतरले.
15
परमेश्वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्यांचा बाराकासमोर तलवारीने धुव्वा उडवला; तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.
16
इकडे बाराकाने हरोशेथ-गोयीमापर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीने पडली; त्यातला एकही वाचला नाही.
17
सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेर्याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते.
18
तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे! भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेर्यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले.
19
तो तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला दे बरे! मला तहान लागली आहे.” तेव्हा तिने दुधाची बुधली उघडून त्याला दूध प्यायला दिले व त्याला झाकले.
20
तो तिला म्हणाला, “डेर्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.”
21
मग हेबेराची बायको याएल हिने डेर्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन, आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारे तो मेला.
22
बाराक सीसराचा पाठलाग करत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करत आहात तो मी तुम्हांला दाखवते.” तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो तर सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
23
अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याचा देवाने इस्राएल लोकांपुढे धुव्वा उडवला.
24
इस्राएल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21