bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Nehemiah 11
Nehemiah 11
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 12 →
1
लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत; वरकड लोकांपैकी दहांतल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि नऊ जणांनी इतर नगरांत वस्ती करावी हे ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.
2
जे स्वसंतोषाने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांना लोकांनी धन्य म्हटले.
3
यरुशलेमेत राहणारे प्रांतांचे प्रमुख हेच होत; पण इस्राएल लोक, याजक, लेवी, नथीनीम व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यरुशलेमेत व यहूदातील आपापल्या नगरांत व वतनांत राहत होते.
4
यरुशलेमेत काही यहूदी व काही बन्यामिनी राहत होते. यहूदाचे वंशज हे: पेरेसाच्या संततीपैकी अथाया बिन उज्जीया बिन जखर्या बिन अमर्या बिन शफाट्या बिन महललेल;
5
मासेया, बिन बारूख बिन कोल-होजे बिन हजाया बिन अदाया बिन योयारीब बिन जखर्या बिन शिलोनी.
6
पेरेसाचे जे वंशज यरुशलेमेत राहत होते ते सर्व चारशे अडुसष्ट वीर पुरुष होते.
7
तसेच बन्यामिनाचे वंशज: सल्लू बिन मशुल्लाम बिन योएद बिन पदाया बिन कोलाया बिन मासेया बिन इथीएल बिन यशाया
8
आणि त्याच्यामागून गब्बई व सल्लाइ ह्यांचे वंशज नऊशे अठ्ठावीस होते.
9
ह्यांचा अधिकारी जिख्रीचा पुत्र योएल होता, आणि हसनूवाचा पुत्र यहूदा नगराचा दुय्यम अधिकारी होता.
10
याजकांतले: यदया बिन योयारीब व याखीन,
11
सराया बिन हिल्कीया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोथ बिन अहीटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता;
12
आणि त्यांचे जे भाऊबंद मंदिरातले काम करीत ते आठशे बावीस होते; अदाया बिन यहोराम बिन पलल्या बिन अस्सी बिन जखर्या बिन पश्हूर बिन मल्कीया;
13
आणि त्याचे भाऊबंद पितृकुळांचे प्रमुख दोनशे बेचाळीस आणि अमशसइ बिन अजरेल बिन अहजई बिन मशिल्लेमोथ बिन इम्मेर;
14
आणि त्यांचे भाऊबंद एकशे अठ्ठावीस बलवान वीर; आणि त्यांचा अधिकारी हगदोलीमाचा पुत्र जब्दीएल हा होता.
15
आणि लेव्यांतले शमया बिन हश्शूब बिन अज्रीकाम बिन हशब्या बिन बुन्नी;
16
आणि लेव्यांच्या मुख्यांपैकी शब्बथई व योजाबाद हे देवाच्या मंदिराच्या बाहेरच्या कामावर होते;
17
आणि प्रार्थनेच्या वेळी ईशोपकारस्मरण आरंभण्याच्या कामी मत्तन्या बिन मीखा बिन जब्दी बिन आसाफ हा मुख्य होता व बकबुक्या आपल्या भाऊबंदातला दुसरा होता; आणि अब्दा बिन शम्मूवा बिन गालाल बिन यदूथून हाही होता.
18
पवित्र नगरातले सर्व लेवी दोनशे चौर्याऐंशी होते.
19
द्वारपाळ अक्कूब व तल्मोन आणि दरवाजे राखणारे त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.
20
वरकड इस्राएल लोक, याजक व लेवी यहूदाच्या सर्व नगरांत आपापल्या वतनात होते;
21
पण नथीनीम ओफेलात राहत; सीहा व गिश्पा हे नथीनीमांवर नेमले होते.
22
उज्जी बिन बानी बिन हशब्या बिन मत्तन्या बिन मीखा हा यरुशलेमेतल्या लेव्यांचा अधिकारी होता; आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते;
23
कारण त्यांच्यासंबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणार्यांची व्यवस्था ठरली होती.
24
यहूदाचा पुत्र जेरह ह्याच्या वंशजांतला मशेजबेल ह्याचा पुत्र पथह्या लोकांसंबधांच्या सर्व गोष्टींच्या बाबतीत राजाच्या हाताशी होता.
25
खेडीपाडी व त्यांच्या शेतवाड्या ह्यांविषयी यहूदाच्या वंशातल्या कित्येकांनी किर्याथ-आर्बात व त्याच्या खेड्यांत, दिबोनात व त्याच्या खेड्यांत आणि यकब्सेलात व त्याच्या खेड्यांत
26
येशूवात, मोलादात व बेथ-पलेतात,
27
हसर-शूवालात, बैर-शेब्यात व त्याच्या खेड्यांत,
28
सिकलागात, मकोनात व त्याच्या खेड्यांत
29
एन्-रिम्मोनात, सारयात, यर्मूथात,
30
जानोहात, अदुल्लामात व त्याच्या खेड्यांत, लाखीशात व त्याच्या शेतवाड्यांत, अजेकात व त्याच्या खेड्यांत वस्ती केली. त्यांनी बैर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्यापर्यंत वस्ती केली.
31
गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यांत,
32
अनाथोथात, नोबात, अनन्यात,
33
हासोरात, रामात, गित्तइमात,
34
हादीदात, सबोइमात, नबल्लाटात,
35
लोदात व कारागिरांच्या खोर्यातल्या ओनात राहू लागले.
36
लेव्यांपैकी यहूदातले काही वर्ग बन्यामिनाकडे होते.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13