bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Nehemiah 12
Nehemiah 12
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 13 →
1
शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व येशूवा ह्यांच्याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे: सराया, यिर्मया, एज्रा,
2
अमर्या, मल्लूख, हट्टूश,
3
शखन्या, रहूम, मरेमोथ,
4
इद्दो, गिन्नथोई, अबीया,
5
मियामीन, माद्या, बिल्गा,
6
शमया, योयारीब, यदया,
7
सल्लू, आमोक, हिल्कीया व यदया; हे येशूवाच्या काळात याजकांतले व त्यांच्या बांधवांतले मुख्य होते.
8
लेवी: येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते;
9
आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्यांच्याबरोबर पहार्यावर होते.
10
येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमाला एल्याशीब झाला, एल्याशीबाला योयादा झाला,
11
योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला.
12
योयाकीमाच्या दिवसांत याजक पितृकुळातले मुख्य होते, ते हे: सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या,
13
एज्रापासून मशुल्लाम, अमर्यापासून यहोहानान,
14
मल्लूखीपासून योनाथान, शबन्यापासून योसेफ,
15
हारीमापासून अदना, मरायोथापासून हेलकइ,
16
इद्दोपासून जखर्या, गिन्नथोनापासून मशुल्लाम,
17
अबीयापासून जिख्री, मिन्यामिनापासून, मोवद्या-पासून पिल्तय,
18
बिल्गापासून शम्मूवा, शमयापासून यहोनाथान,
19
योयारीबापासून मत्तनई, यदयापासून उज्जी,
20
सल्लाइपासून कल्लय, आमोकापासून एबेर,
21
हिज्कीयापासून हशब्या व यदायापासून नथनेल.
22
एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दूवा ह्यांच्या काळात लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळाचे मुख्य होते.
23
लेव्यांचे वंशज, आपापल्या पितृकुळांचे मुख्य, इतिहासाच्या पुस्तकात, एल्याशिबाचा पुत्र योहानान ह्याच्या काळापर्यंत नमूद केले होते;
24
आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते.
25
मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशींवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत;
26
हे योयाकीम बिन येशूवा बिन योसादाक ह्याच्या दिवसांत व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एज्रा याजक ह्यांच्या दिवसांत होते.
27
यरुशलेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या वेळी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांजा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा म्हणून त्यांना यरुशलेमेत पोचवण्यासाठी त्यांच्या-त्यांच्या स्थानांतून शोधून काढले.
28
यरुशलेमेच्या चोहोकडल्या प्रांतांतून नटोफाथीच्या खेड्यापाड्यांतून,
29
बेथ-गिलगाल येथून आणि गेबा व अजमावेथ येथल्या शेतवाडीतून गायकांचे वंशज एकत्र झाले; त्यांनी यरुशलेमेच्या आसपास खेडी वसवली होती.
30
मग याजक व लेवी ह्यांनी स्वतःस शुद्ध करून लोकांची, वेशींची व कोटाची शुद्धी केली.
31
मी यहूदाच्या सरदारांना कोटावर चढवले आणि त्यांच्या दोन टोळ्या केल्या; त्या स्तोत्रे गात मिरवत चालल्या; त्यांची एक टोळी दक्षिण दिशेने म्हणजे उकिरडावेशीकडे चालली;
32
आणि तिच्यामागून होशया, यहूदाचे अर्धे अधिकारी,
33
अजर्या, एज्रा, मशुल्लाम,
34
यहूदा बन्यामीन, शमया, यिर्मया,
35
व कित्येक याजकांचे पुत्र कर्णे घेऊन चालले; जखर्या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मीखाया बिन जक्कूर बिन आसाफ,
36
आणि त्याचे भाऊबंद शमया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद ह्याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्यापुढे एज्रा शास्त्री चालला;
37
ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायर्यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले.
38
स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यांना येऊन मिळण्यास पुढे चालली, आणि तिच्यामागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टीबुरुजावरून रुंद कोटापर्यंत,
39
आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेस, हनानेल बुरूज व हमया बुरूज ह्यांवरून मेंढेवेशीपर्यंत गेलो; गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले.
40
अशा प्रकारे स्तोत्रे म्हणणार्या दोन्ही टोळ्या देवाच्या मंदिरात उभ्या राहिल्या; मी व माझ्याबरोबर अर्धे अधिपतीही उभे राहिले;
41
याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखर्या व हनन्या ह्यांनी कर्णे हाती घेतले;
42
आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर ह्यांनीही कर्णे हाती घेतले; गायकांनी उंच स्वराने गाइले; यिज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता.
43
त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.
44
याजक व लेवी ह्यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावेत म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश ह्यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले; कारण याजक व लेवी हे हजर राहिल्याकारणाने यहूदास आनंद झाला होता.
45
दाविदाच्या व त्याचा पुत्र शलमोन ह्याच्या आज्ञेप्रमाणे ते आपल्या देवाच्या मंदिराचे व शुद्धीकरणाचे काम करीत; तसेच गायक व द्वारपाळ हेही करीत.
46
प्राचीन काळी म्हणजे दावीद व आसाफ ह्यांच्या दिवसांत एक मुख्य गायक व देवाची स्तुतिस्तोत्रे ह्यांची योजना केली होती.
47
जरूब्बाबेल व नहेम्या ह्यांच्या दिवसांत सर्व इस्राएल लोक गायकांना व द्वारपाळांना दर दिवसाचा शिधा देत असत; ते लेव्यांचे वाटे काढून ठेवत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवत.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13