bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Nehemiah 7
Nehemiah 7
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 8 →
1
कोट बांधण्याचे काम संपल्यावर मी त्याला दरवाजे बसवले आणि द्वारपाळ, गायक व लेवी ह्यांची नेमणूक केली;
2
तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या ह्यांना यरुशलेमेचे अधिकारी नेमले; हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगत असे.
3
मी त्यांना सांगितले, “उन्हाचा ताप होईपर्यंत यरुशलेमेच्या वेशी उघडू नयेत, लोक काम करीत असता वेशींचे दरवाजे लावून त्यांना अडसर घालावेत, यरुशलेमकरांचे पहारे नेमावेत आणि प्रत्येकाने आपापल्या घरासमोर पहारा करावा.”
4
नगर विस्तीर्ण व मोठे होते, पण त्यात लोक थोडे असून अद्यापि घरे बांधली नव्हती.
5
सरदार, शास्ते व इतर लोक जमा करून त्यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी असे माझ्या देवाने माझ्या मनात घातले. जे प्रथम यरुशलेमेत आले होते त्यांच्या वंशावळीची वही मला सापडली व तिच्यात हे लिहिलेले सापडले:
6
बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने जे लोक धरून नेले होते त्यांतले त्या मुलखात राहत होते ते लोक बंधमुक्त होऊन यरुशलेमेस व यहूदातील आपापल्या नगरांत परत गेले ते हे:
7
येशूवा, नहेम्या, अजर्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम, व बाना. जे जरूब्बाबेलबरोबर आले ते हेच. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची संख्या ही होती:
8
परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर.
9
शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर.
10
आरहाचे वंशज सहाशे बावन्न.
11
येशूवा व यवाब ह्यांच्या कुळांतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे अठरा.
12
एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
13
जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस.
14
जक्काईचे वंशज सातशे साठ.
15
बिन्नुईचे वंशज सहाशे अठ्ठेचाळीस.
16
बेबाईचे वंशज सहाशे अठ्ठावीस.
17
अजगादाचे वंशज दोन हजार तीनशे बावीस.
18
अदोनीकामाचे वंशज सहाशे सदुसष्ट.
19
बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट.
20
आदीनाचे वंशज सहाशे पंचावन्न.
21
हिज्कीयाच्या आटेराचे वंशज अठ्ठ्याण्णव.
22
हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस.
23
बेसाईचे वंशज तीनशे चोवीस.
24
हारीफाचे वंशज एकशे बारा.
25
गिबोनाचे वंशज पंचाण्णव.
26
बेथलेहेम व नटोफा येथील माणसे एकशे अठ्ठ्याऐंशी.
27
अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस.
28
बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस.
29
किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथ येथील माणसे सातशे त्रेचाळीस.
30
रामा व गेबा येथील माणसे सहाशे एकवीस.
31
मिखमासाची माणसे एकशे बावीस.
32
बेथेल व आय येथील माणसे एकशे तेवीस.
33
दुसर्या नबोची माणसे बावन्न.
34
दुसर्या एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
35
हारीमाचे वंशज तीनशे वीस.
36
यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस.
37
लोद, हादीद व ओनो ह्यांचे वंशज सातशे एकवीस.
38
सनावाचे वंशज तीन हजार नऊशे तीस.
39
याजक: यदयाच्या कुळातील येशूवाच्या घराण्यातील नऊशे त्र्याहत्तर.
40
इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न.
41
पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस.
42
हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
43
लेवी: येशूवाचे वंशज, कदमीएलाचे होदवाच्या वंशजांतले, चौर्याहत्तर.
44
गाणारे: आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस.
45
द्वारपाळ शल्लूमाचे वंशज, अटेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, शोबाचे वंशज, एकशे अडतीस.
46
नथीनीम: सीहाचे वंशज, हशूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज,
47
केरोसाचे वंशज, सीयाचे वंशज, पादोनाचे वंशज,
48
लबोनाचे वंशज, हगाबाचे वंशज, सल्माईचे वंशज,
49
हानानाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, गहाराचे वंशज,
50
रायाचे वंशज, रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज,
51
गज्जामाचे वंशज, उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज,
52
बेसाईचे वंशज, मऊनीमाचे वंशज, नफूशेसीमाचे वंशज,
53
बकबुकाचे वंशज, हकूफाचे वंशज, हर्हूराचे वंशज,
54
बसलीथाचे वंशज, महीदाचे वंशज, हर्षाचे वंशज,
55
बर्कोसाचे वंशज, सीसराचे वंशज, तामहाचे वंशज,
56
नसीहाचे वंशज, हतीफाचे वंशज.
57
शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, सोफेरेथाचे वंशज, परिदाचे वंशज.
58
यालाचे वंशज, दर्कोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज.
59
शफाट्याचे वंशज, हत्तीलाचे वंशज, हस्सबाइमाच्या पोखरेथाचे वंशज, आमोनाचे वंशज.
60
सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते.
61
तेल-मेलह, तेल-हर्शा, करूब, अद्दोन व इम्मेर येथून जे वर आले ते हेच; पण ते इस्राएलांपैकी होते की नव्हते ह्याविषयी त्यांना आपापले पितृकूळ व आपापली वंशावळी दाखवता आली नाही;
62
दलायाचे वंशज, तोबीयाचे वंशज, नकोदाचे वंशज, सहाशे बेचाळीस.
63
याजकांपैकी: हबायाचे वंशज, हक्कोसाचे वंशज व बर्जिल्लयाचे वंशज; ह्या बर्जिल्लयाने गिलादी बजिल्लय ह्याच्या कन्यांपैकी एकीशी लग्न केले, आणि त्याचे नाव घेतले.
64
ह्यांनी आपल्या वंशावळीचे पत्र इतर वंशावळ्यांच्या पत्रांत शोधून पाहिले, पण ते सापडले नाही, म्हणून ते अशुद्ध ठरून त्यांना याजकपदाच्या यादीतून काढून टाकले.
65
तिर्शाथा (प्रांताधिपती) ह्याने त्यांना सांगितले की, “उरीम व थुम्मीम धारण करणारा याजक उभा राहीपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाऊ नयेत.”
66
सर्व मंडळीतले लोक मिळून बेचाळीस हजार तीनशे साठ भरले;
67
त्यांखेरीज त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दास-दासी व दोनशे पंचेचाळीस गाणारे व गाणारणी होत्या.
68
त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस,
69
उंट चारशे पस्तीस व गाढवे सहा हजार सातशे वीस एवढी होती.
70
पितृकुळांच्या प्रमुखांपैकी काहींनी ह्या कार्यास मदत केली. तिर्शाथाने एक हजार दारिक1 सोने, पन्नास कटोरे व पाचशे तीस याजकीय वस्त्रे एवढी भांडारात जमा केली.
71
पितृकुळातील आणखी काही पुरुषांनी ह्या कामाच्या खजिन्यात वीस हजार दारिक सोने, आणि दोन हजार दोनशे माने1 रुपे पावती केले.
72
वरकड लोकांनी वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि सदुसष्ट याजकीय वस्त्रे पावती केली.
73
ह्या प्रकारे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व इतर काही लोक; नथीनीम व सर्व इस्राएल आपापल्या नगरांत राहू लागले. सातवा महिना आला तेव्हा सर्व इस्राएल आपापल्या नगरात होते.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13