bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Hebrews 11
Hebrews 11
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 12 →
1
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.
2
विश्वासानेच आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले.
3
विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची निर्मिती झाली, अशी की, जे दिसते ते अदृश्य वस्तूपासून झाले.
4
विश्वासाने हाबेलने काइनपेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला, त्यावरून तो नीतिमान आहे, अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने त्याची दाने स्वीकारून दिली आणि तो निधन पावला असला, तरी त्याच्या विश्वासाद्वारे तो अजूनपर्यंत बोलत आहे.
5
हनोखला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासामुळे लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला प्रसन्न करीत असे;
6
विश्वासावाचून परमेश्वराला प्रसन्न करणे अशक्य आहे; देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास बाळगला पाहिजे की, देव आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो पारितोषिक देणारा आहे.
7
जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली व तिच्याप्रमाणे त्याने आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणाऱ्या नीतिमत्त्वाचा तो वतनदार झाला.
8
अब्राहामला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते, तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने तयार झाला; आणि आपण कोठे जातो, हे ठाऊक नसताही तो निघाला.
9
परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला; त्याच वचनाचे सहभागी वारस म्हणून इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्यांची वसती होती;
10
कारण दृढ पाया असलेल्या, देवाने योजिलेल्या व बांधलेल्या नगराची अब्राहाम वाट पाहत होता.
11
वयोमर्यादेपलीकडे असताही त्याला बाप होण्याची क्षमता मिळाली व सारालादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण त्याने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले.
12
अब्राहाम जणू काही निर्जीव झालेला असतानाही ह्या एकापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली.
13
हे सर्व जण विश्वास ठेवून देवाघरी गेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, मात्र त्यांनी ती दुरून पाहिली व तिचे स्वागत केले आणि आपण पृथ्वीवर परके व निराश्रीत आहोत हे स्वीकारले.
14
असे म्हणणारे स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात.
15
ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते, तर त्यांना परत जाण्याची संधी होती;
16
पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगत होते; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.
17
अब्राहामने आपली कसोटी पाहिली जात असता विश्वासाने इसहाकचे अर्पण केले; अब्राहामला वचन देण्यात आले होते तरीही तो आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करायला तयार होता;
18
परमेश्वराने त्याला असे सांगितले होते, ‘इसहाकच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील’;
19
तेव्हा मेलेल्यांतून उठवावयासदेखील देव समर्थ आहे, हे अब्राहामने मानले आणि लाक्षणिक अर्थाने त्या स्थितीतून तो त्याला परत मिळाला.
20
इसहाकने याकोब व एसाव ह्यांना भविष्यासाठी विश्वासाने आशीर्वाद दिला.
21
याकोबने मरते वेळेस योसेफच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाची आराधना केली.
22
योसेफने मरतेवेळेस इस्राएलच्या संतानाच्या निर्गमनाचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी निर्देश दिले.
23
मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले; कारण ते मूल गोंडस आहे, असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही.
24
मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले;
25
पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले;
26
ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही इजिप्त देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती, आहे असे त्याने मानले; कारण त्याची दृष्टी भावी फलप्राप्तीवर होती.
27
त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने इजिप्त देश सोडला; कारण अदृश्य देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.
28
त्याने वल्हांडण सण व रक्त लावणे हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना स्पर्श करू नये.
29
तांबड्या समुद्रातून ते विश्वासाने जणू कोरड्या भूमीवरून जावे त्याप्रमाणे पार गेले; मिसरमधील लोक तसेच प्रयत्न करीत असता बुडून गेले.
30
इस्राएली लोकांनी यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस प्रदक्षिणा घातल्यावर त्यांच्या विश्वासामुळे ते नगर पडले.
31
राहाब वेश्येने स्नेहभावाने व विश्वासाने इस्राएली हेरांचा स्वीकार केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही.
32
आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे, ह्यांचे वर्णन करू लागलो, तर वेळ पुरणार नाही.
33
त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली,
34
अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बल असता सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये धुळीला मिळवली.
35
स्त्रियांना त्यांची मृत माणसे विश्वासामुळे पुनरुत्थान झालेली मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्याचा त्याग करून हालअपेष्टा सोसल्या.
36
काहींना टवाळ्या, मारहाण, बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला;
37
त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना मोहपाशात टाकले, करवतीने कापले, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते;
38
त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत.
39
ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही;
40
कारण देवाने आपणासाठी अधिक चांगली योजना आखली होती आणि ती म्हणजे त्यांना आपणासर्वांबरोबर पूर्णत्व प्राप्त व्हावे.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13