bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Hebrews 13
Hebrews 13
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
1
ख्रिस्ती बंधुभगिनी म्हणून प्रीतीत टिकून राहा.
2
आदरातिथ्याचा विसर पडू देऊ नका; त्यामुळे कित्येकांनी नकळत देवदूतांचे आतिथ्य केले आहे.
3
तुरुंगात पडलेल्यांबरोबर तुम्ही तुरुंगात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहात म्हणून पीडितांची आठवण ठेवा.
4
लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.
5
तुम्ही द्रव्यलोभापासून अलिप्त राहा; जे तुमच्याजवळ आहे तेवढ्यावर तृप्त रहा; कारण परमेश्वराने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही’.
6
म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणू या, प्रभू माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?
7
पूर्वी जे तुमचे आधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
8
येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुगे सारखाच आहे.
9
विविध आणि विचित्र प्रकारच्या शिकवणुकींनी बहकून जाऊ नका; अन्नविषयक नियमांनी नव्हे कारण हे नियम जे पाळतात त्यांना त्यांचा काही लाभ होत नाही. कृपेच्या सामर्थ्याने अंतःकरण मजबूत करणे हितावह आहे.
10
मंडपात आराधना करणाऱ्या यहुदी याजकांना वेदीवर अर्पण केलेले अन्न खाण्याचा अधिकार नाही.
11
यहुदी प्रमुख याजक आपल्या पापांबद्दल क्षमा मिळावी म्हणून पशूंचे रक्त पवित्र स्थानात घेऊन जातात परंतु त्या पशूंची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात.
12
म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून नगराच्या प्रवेशद्वाराबाहेर मरण सोसले,
13
तर आता आपण त्याबद्दल विटंबना सोशीत छावणीबाहेर त्याच्याजवळ जाऊ या.
14
कारण आपल्याकरिता येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत.
15
ज्या ओठांनी आपण त्याचा देव म्हणून स्वीकार करतो, त्या ओठांचे फळ म्हणून आपण स्तुतीचा यज्ञ देवाला नित्य अर्पण करू या.
16
चांगले करण्यास व एकमेकांना साहाय्य करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.
17
तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे, हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, दुःखी मनाने नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.
18
आमच्यासाठी प्रार्थना करा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ आहे, अशी आमची खातरी आहे.
19
मी शक्य तेवढ्या लवकर तुमच्याकडे यावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा, अशी मी तुम्हांला आवर्जून विनंती करीत आहे.
20
आता ज्या शांतिदात्या देवाने शाश्वत कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यांतून उठविले,
21
तो देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरिता आवश्यक अशा सर्व चांगल्या गोष्टी तुम्हांला पुरवो व त्याला जे आवडते, ते तो येशू ख्रिस्ताद्वारे आपणामध्ये घडवून आणो. ख्रिस्ताचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.
22
बंधूंनो, मी तुम्हांला आवाहन करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.
23
आपला बंधू तीमथ्य ह्याची तुरुंगातून सुटका झाली आहे, हे मी तुम्हांला कळवू इच्छितो. तो लवकर आला, तर मी तुमच्या भेटीस येईन तेव्हा त्याला बरोबर आणीन.
24
तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना व सर्व पवित्र लोकांना आमच्या शुभेच्छा सांगा. इटलीतील बंधूंजन तुम्हांला शुभेच्छा देतात.
25
तुम्हां सर्वांवर देवाची कृपा राहो.
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13