bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Hebrews 6
Hebrews 6
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
1
आपण ख्रिस्ती संदेशाच्या प्राथमिक गोष्टींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत प्रगती करण्याचा नेटाने प्रयत्न करू या. निरुपयोगी कृत्यांपासून परावृत्त होणे व देवावर श्रद्धा ठेवणे,
2
बाप्तिस्मे, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान व शाश्वत न्यायनिवाडा ह्या गोष्टींविषयीच्या शिक्षणाचा पाया आपण पुन्हा घालू नये.
3
आपण पुढे जाऊ या. परमेश्वर होऊ देईल तर हे आपण करू या.
4
कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले
5
आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली,
6
त्यांचे जर पतन झाले, तर त्यांना पश्चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने क्रुसावर खिळतात व त्याचा उघड-उघड अपमान करतात.
7
जी जमीन आपल्यावर वारंवार पडलेला पाऊस शोषून घेते व लागवड करणाऱ्याला उपयोगी असे पीक देते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो;
8
पण जी जमीन काटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट अग्नीने होईल.
9
जरी आम्ही असे बोललो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या म्हणजे तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे.
10
तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती, हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.
11
आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने आपली आस्था शेवटपर्यंत टिकवून ठेवावी.
12
म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्यायोगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे ठरतात त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे व्हावे.
13
देवाने अब्राहामला वचन दिले, तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी थोर नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले,
14
मी तुला निश्चित आशीर्वाद देईन व तुला निश्चित बहुगुणित करीन.
15
त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला.
16
माणसे आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे.
17
म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी ह्या इच्छेने देवाने शपथेद्वारे हमी दिली,
18
ह्यासाठी की, आपणापुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करून घेण्याकरिता आपण देवाचा आश्रय घेतला असल्यामुळे आपल्याला ह्या दोन गोष्टींमुळे उत्तेजन मिळावे:अभिवचन आणि शपथ ह्या दोन गोष्टी न बदलणाऱ्या असून त्यांच्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.
19
आपल्याला मिळालेली आशा आपल्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या नांगरासारखी आहे. ही आशा सुरक्षित व निश्चित असून स्वर्गीय मंदिराच्या पडद्यामागील आतील पवित्र स्थानात पोहोचणारी आहे.
20
तेथे मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगांचा प्रमुख याजक झालेला येशू आपल्या अगोदर आपल्याकरिता आत गेला आहे.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13