bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Matthew 13
Matthew 13
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 14 →
1
त्याच दिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या काठावर जाऊन बसला.
2
लोकांच्या झुंडी त्याच्याजवळ इतकी गर्दी करू लागल्या की, तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक काठावर उभे राहिले.
3
त्याने त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकविल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला.
4
तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकले.
5
काही खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले.
6
परंतु सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि मुळे नसल्यामुळे वाळून गेले.
7
काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. ती झुडुपे वाढल्याने ते गुदमरून गेले.
8
काही सुपीक जमिनीत पडले. त्याला शंभरपट, साठपट, तर तीसपट असे पीक आले.
9
ज्याला ऐकण्यासाठी कान असतील त्याने ऐकावे!”
10
तेव्हा शिष्यांनी जवळ येऊन त्याला विचारले, “आपण लोकांना उपदेश करताना दाखले का देता?”
11
त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे ज्ञान तुम्हांला दिलेले आहे परंतु त्यांना ते ज्ञान दिलेले नाही.
12
कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल व त्याची भरभराट होईल; परंतु ज्या कोणाजवळ काहीच नाही त्याचे थोडेफार जे असेल तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल.
13
ते बघतात पण त्यांना दिसत नाही; ते ऐकतात पण त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांना समजतही नाही. म्हणून त्यांना प्रबोधन करताना मी दाखले देतो.
14
यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे. तो असा, “तुम्ही ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही, तुम्ही पाहाल पण तुम्हांला कळणार नाही’,
15
ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. नाही तर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, कानांनी ऐकतील, त्यांच्या अंतःकरणांना समजेल, ते माझ्याकडे वळतील व मी त्यांना बरे करीन.
16
परंतु धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान कारण ते ऐकत आहेत.
17
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही जे पाहात आहात ते पाहायला पुष्कळ संदेष्टे व नीतिमान उत्कंठित झाले होते तरीसुद्धा त्यांना ते पाहायला मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकत आहात ते ऐकायला ते उत्कंठित झाले होते पण त्यांना ते ऐकायला मिळाले नाही.
18
तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या.
19
जो स्वर्गाच्या राज्याचे वचन ऐकतो पण त्याला ते समजत नाही तो वाटेवर पडलेल्या बीप्रमाणे आहे. त्याच्या अंतःकरणात जे पेरले होते ते सैतान येऊन हिरावून घेतो.
20
जो वचन ऐकतो व ते आनंदाने तत्काळ ग्रहण करतो, तो खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे.
21
परंतु ते त्याच्या अंतःकरणात खोल मूळ धरत नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो; देवाच्या शब्दामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो विचलित होतो.
22
जो वचन ऐकतो, पण संसाराची चिंता व पैशाच्या मोहामुळे ज्याच्यात वचनाची वाढ खुंटते व जो निष्फळ राहतो, तो काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखा आहे.
23
जो वचन ऐकून ते समजून घेतो, तो चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. त्याचे पीक मिळते - कुठे शंभरपट, कुठे साठपट, तर अन्यत्र तीसपट.”
24
त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले.
25
परंतु सर्व झोपलेले असताना त्याचावैरी आला आणि गव्हामध्ये निदण पेरून गेला.
26
जेव्हा रोपटी वाढली व कणसे आली तेव्हा निदणही वाढलेले दिसू लागले.
27
तेव्हा त्या माणसाच्या नोकरांनी येऊन त्याला विचारले, “धनी, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले असताना त्यात निदण कोठून आले?’
28
तो त्यांना म्हणाला, “हे काम कोणा वैऱ्याचे आहे.’ नोकरांनी त्याला म्हटले, “आम्ही जाऊन ते निदण गोळा करावे, अशी आपली इच्छा आहे काय?’
29
परंतु तो मनुष्य म्हणाला, “नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूदेखील उपटाल.
30
कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीच्या वेळी मी कापणाऱ्यांना सांगेन की, प्रथम निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि नंतर गहू गोळा करून माझ्या कोठारात साठवा.’”
31
येशूने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला ठेवला तो असा: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने आपल्या शेतात लावला.
32
तो सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी उगवल्यावर सर्व रोपट्यांमध्ये मोठा होऊन त्याचे झाड होते आणि आकाशातील पक्ष्यांना त्याच्या फांद्यांवर वसती करता येते.”
33
येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगले.”
34
दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे.
35
‘मी त्यांच्याशी बोलताना दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे अज्ञात आहे, ते प्रकट करीन’, असे संदेष्ट्याद्वारे जे सांगितले गेले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे घडले.
36
लोकसमुदायास निरोप देऊन येशू घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाचा दाखला आम्हांला समजावून सांगा.”
37
त्याने उत्तर दिले, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे.
38
शेत हे जग आहे, चांगले बी म्हणजे स्वर्गराज्याचे लोक आहेत.
39
निदण म्हणजे सैतानाची प्रजा. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणीची वेळ म्हणजे युगाच्या समाप्तीचा समय व कापणी करणारे हे देवदूत आहेत.
40
जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल.
41
मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून
42
अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल.
43
त्या वेळी नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तळपतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!
44
स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. तो एका मनुष्याला सापडतो. तो मनुष्य खजिना पुन्हा लपवून ठेवतो. नंतर तो आनंदाच्या भरात जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
45
तसेच स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखे आहे.
46
त्याला असामान्य प्रतीचा एक मोती आढळला. त्याने जाऊन त्याचे सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
47
स्वर्गाचे राज्य हे सरोवरात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. त्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र पकडले जातात.
48
जाळे भरल्यावर कोळी लोक ते काठावर ओढतात आणि चांगले मासे भांड्यांत जमा करतात, पण खराब ते फेकून देतात.
49
तसे युगाच्या शेवटी होईल, देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील व
50
त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल.
51
तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय.”
52
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.”
53
हे दाखले सांगण्याचे पूर्ण केल्यावर येशू तेथून निघून गेला.
54
स्वतःच्या गावी आल्यावर त्याने तेथील लोकांना सभास्थानात अशी शिकवण दिली की, ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून प्राप्त झाले?
55
हा सुताराचा मुलगा ना? मरिया ह्याची आई ना? याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना?
56
ह्याच्या सर्व बहिणी येथेच राहतात ना? मग हे सर्व ह्याला कोठून मिळाले?”
57
आणि त्यांनी येशूचा अव्हेर केला. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला त्याच्या देशात व स्वतःच्या घरी सन्मान मिळत नाही.”
58
तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे फारसे चमत्कार केले नाहीत.
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28