bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Matthew 5
Matthew 5
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 6 →
1
लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
2
तेव्हा तो त्यांना शिकवू लागला.
3
“जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4
जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल.
5
जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.
6
ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
7
जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल.
8
जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
9
जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
10
नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
11
माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य.
12
आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.
13
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? ते मीठ बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.
14
तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही.
15
दिवा पेटवून तो मापाखाली नव्हे तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.
16
त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
17
नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ नष्ट करायला मी आलो आहे, असे समजू नका; मी नष्ट करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे.
18
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत व सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा नाहीशी होणार नाही.
19
म्हणून जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी मोडील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.
20
मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही.
21
प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे, “खून करू नकोस आणि जो कोणी खून करील, त्याचा न्याय केला जाईल.’
22
मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याच्या भावावर विनाकारण रागावेल, त्याचा न्याय केला जाईल. जो कोणी त्याच्या भावाला, “अरे मूर्खा’, असे म्हणेल, तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र ठरेल. तसेच जो कोणी त्याला ‘अरे महामूर्खा’, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.
23
तर मग तू आपले दान अर्पण करण्याकरता वेदीजवळ आणत असता तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे, असे तुला आठवले,
24
तर तेथे वेदीपुढे तुझे दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम तुझ्या भावाबरोबर समेट कर व नंतर येऊन तुझे दान अर्पण कर.
25
वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत त्याच्याशी समेट कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील.
26
मी तुला खातरीपूर्वक सांगतो, पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तू त्यातून सुटणार नाहीस.
27
‘व्यभिचार करू नकोस’, असे प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.
28
परंतु मी तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहतो, त्याने त्याच्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे.
29
तुझा उजवा डोळा जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे.
30
तुझा उजवा हात जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे.
31
असे सांगितले होते, “जो कोणी त्याची पत्नी टाकेल, त्याने तिला सूटपत्र द्यावे’,
32
परंतु आता मी तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याची पत्नी व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तो व्यभिचार करतो.
33
तसेच ‘खोटी शपथ वाहू नकोस आणि प्रभूपुढे घेतलेल्या तुझ्या शपथा पूर्ण कर’, असे प्राचीन लोकांना सांगितलेले तुम्ही ऐकले आहे.
34
मात्र मी आता तुम्हांला सांगतो, शपथ मुळीच वाहू नकोस, स्वर्गाची नको कारण ते देवाचे राजासन आहे;
35
पृथ्वीचीही नको कारण ती त्याचे पादासन आहे आणि यरुशलेमची नको कारण ती थोर राजाची नगरी आहे.
36
तुझ्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस कारण तू तुझा एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.
37
उलट तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, असे असावे. ह्यापेक्षा जे अधिक, ते वाइटाकडून येत असते.
38
‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.
39
परंतु आता मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल कर.
40
जो कोणी तुझ्यावर फिर्याद करून तुझे शर्ट घेतो, त्याला तुझा कोटही घेऊ दे.
41
जो कोणी तुझ्यावर बळजबरी करून तुला त्याचे सामान एक किलोमीटर वाहायला लावील त्याच्याबरोबर तू दोन किलोमीटर जा.
42
जो तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझ्याकडून उसने घेऊ पाहतो, त्याला टाळू नकोस.
43
‘तू तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर व तुझ्या शत्रूचा द्वेष कर’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.
44
परंतु आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
45
अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याची मुले व्हावेत; कारण तो दुर्जनांवर व सज्जनांवर सूर्य उदयास आणतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
46
जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हांला काय पारितोषिक मिळणार? जकातदारही तसेच करतात ना?
47
तुम्ही केवळ तुमच्या बंधुजनांना प्रणाम करत असला तर विशेष ते काय करता? जकातदारही तसेच करतात ना?
48
म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28