bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Matthew 23
Matthew 23
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 24 →
1
नंतर येशू लोकसमुदायाला व त्याच्या शिष्यांना म्हणाला,
2
“शास्त्री व परुशी मोशेच्या आसनावर बसले आहेत.
3
म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतात, ते सर्व पाळा व करा, परंतु ते वागतात तसे तुम्ही वागू नका, कारण ते सांगतात तसे ते स्वतः करत नाहीत.
4
जड ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर लादतात परंतु ती वाहायला ते स्वतः बोटही लावत नाहीत.
5
ते त्यांची सर्व कामे लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते त्यांचे मंत्रपट्टे व त्यांच्या वस्त्रांच्या किनारी रुंद करतात.
6
मेजवानीत मानाच्या जागा व सभास्थानांत राखीव आसने मिळवणे,
7
बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून ‘गुरुजी, गुरुजी’, म्हणवून घेणे त्यांना आवडते.
8
तुम्ही मात्र स्वतःला ‘गुरुजी’ म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व बंधू आहात.
9
पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे.
10
तसेच स्वतःला नेता म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा नेता एक आहे, तो ख्रिस्त होय.
11
उलट, तुमच्यामध्ये जो सर्वांत थोर असेल, त्याने तुमचा सेवक व्हावे.
12
जो कोणी स्वतःला उच्च करील त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करील त्याला उच्च केले जाईल.
13
अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता. तुम्ही स्वतः आत जात नाही व जे आत जात आहेत त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही.
14
[अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करता. ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.]
15
अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही एक शिष्य मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या दुप्पट असा नरकपुत्र बनवता.
16
अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता की, कोणी मंदिराची शपथ घेतली, तर त्यात काही वावगे नाही. परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली, तर मात्र ती त्याला बंधनकारक ठरते.
17
अहो मूर्खानो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? ते सोने की ज्याच्यामुळे ते पवित्र झाले ते मंदिर?
18
तुम्ही म्हणता की, कोणी वेदीची शपथ घेतली, तर त्यात काही अयोग्य नाही. परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर ती त्याला बंधनकारक ठरते.
19
अहो आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? अर्पण की अर्पण पवित्र करणारी ती वेदी?
20
म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो, तो तिची व तिच्यावर जे काही आहे, त्याची शपथ घेतो.
21
जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो.
22
जो स्वर्गाची शपथ घेतो, तो परमेश्वराच्या राजासनाची व त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो.
23
अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व श्रद्धा ह्यांकडे दुर्लक्ष करता. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ह्यादेखील तुम्ही करायच्या होत्या.
24
अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही माशी गाळून काढता व उंट गिळून टाकता!
25
अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण आतून ती अत्याचार व असंयम ह्यांनी भरलेली आहे.
26
अरे आंधळ्या परुश्या, प्रथम वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल.
27
अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात, त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आतून त्या मेलेल्यांच्या हाडांनी व घाणीने भरलेल्या असतात.
28
तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व दुष्टपणाने भरलेले आहात.
29
अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरी बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता
30
आणि दावा करता, “आम्ही आमच्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’
31
ह्यामुळे तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे वंशज आहात, अशी स्वतःविरुद्ध साक्ष देता.
32
तर मग, तुमच्या पूर्वजांचे कृत्य तुम्ही पूर्ण करा.
33
अहो सापांनो आणि सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?
34
पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो, तुम्ही त्यांच्यातील काही जणांना ठार माराल व क्रुसावर खिळाल आणि इतरांना तुम्ही तुमच्या सभास्थानांत फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल.
35
म्हणून नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर सांडण्यात आले आहे, त्याचा दोष तुमच्यावर येईल.
36
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या सर्व कृत्यांची शिक्षा आजच्या पिढीला भोगावी लागेल.
37
यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या नगरी, तुझ्याकडे पाठवलेल्यांवर धोंडमार करणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची माझी कितीदा तरी इच्छा होती. पण तू मला तसे करू दिले नाहीस.
38
पाहा, तुमचे घर तुम्हांला सोडून द्यावे लागेल आणि ते ओस पडेल.
39
कारण मी तुम्हांला सांगतो, आतापासून पुढे, “जो प्रभूच्या नावाने येत आहे, तो धन्य’ असे तुम्ही म्हणू लागाल, तोपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 24 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28