bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Revelation 15
Revelation 15
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 16 →
1
त्यानंतर मी अत्यंत रहस्यमय, थक्क करणारे व भव्य असे दुसरे एक दृश्य स्वर्गात पाहिले. सात साथीचे रोग आणणारे सात देवदूत दृष्टीस पडले. ते रोग शेवटचे होते, कारण देवाच्या क्रोधाची ती अंतिम अभिव्यक्ती होती.
2
मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक हातात देवाने दिलेल्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.
3
ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकराचे गीत गाताना म्हणत होते: “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये किती थोर व आश्चर्यकारक आहेत! हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग न्याय्य व सत्य आहेत.
4
हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? तूच एकमेव पवित्र आहेस. सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुझी आराधना करतील, कारण तुझी न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”
5
नंतर मी पाहिले, तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीच्या मंडपामध्ये असलेले स्वर्गातील मंदिर उघडले
6
आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व छातीवर सोन्याचे पट्टे बांधलेले असे, सात पीडा घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले.
7
त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुगे जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांस दिल्या.
8
तेव्हा देवाचे वैभव व सामर्थ्य ह्यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 16 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22