bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Revelation 19
Revelation 19
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 20 →
1
ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जणू एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “देवाचा गौरव असो! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत!”
2
कारण त्याचे न्याय सत्याचे व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायविवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.
3
ते दुसऱ्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिला भस्मसात करणाऱ्या ज्वालांचा धूर युगानुयुगे वर चढत आहे!”
4
तेव्हा ते चोवीस वडीलजन व ते चार प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाची आराधना करीत म्हणाले, “आमेन! हालेलूया!”
5
इतक्यात राजासनाकडून वाणी झाली, ती म्हणाली, “अहो, आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लाहनथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”
6
तेव्हा जणू काही मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला, त्याने घोषणा केली, “हालेलूया! कारण सर्वसमर्थ आमचा प्रभू देव ह्याने राजाधिकार हाती घेतला आहे.”
7
आपण आनंद करू व उ्रास करू व त्याचा गौरव करू कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजविले आहे,
8
तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे, ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत.
9
तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”
10
तेव्हा मी त्याच्या पाया पडून त्याची आराधना करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, “तू असे मुळीच करू नकोस! मी तुझा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंचा दास आहे. देवाची आराधना कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.”
11
त्यानंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो न्यायबुद्धीने न्यायनिवाडा करतो व लढतो.
12
त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ रत्नजडित मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते. ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही.
13
रक्तात बुडवून काढलेला झगा त्याने अंगावर घातला होता. ‘देवाचा शब्द’ हे त्याचे नाव होते.
14
स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यांवर बसून स्वच्छ पांढरी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती.
15
त्याने राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघाली. तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवील.
16
त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ हे नाव लिहिलेले होते.
17
नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, देवाच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा!
18
राजांचे, सैन्याधिकाऱ्यांचे व सैनिकांचे, घोड्यांचे व त्यांवरील स्वारांचे, तसेच स्वतंत्र व दास, लहान आणि मोठ्या अशा सर्व लोकांचे मांस खावयास या!”
19
तेव्हा ते श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये हे सारे घोड्यावर बसलेल्या स्वाराविरूद्ध व त्याच्या सैन्यांविरूद्ध लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली.
20
मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चमत्कार करून ठकविले होते. ह्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले.
21
त्यांची सैन्ये घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारली गेली आणि त्यांच्या मांसाने सर्व पक्षी तृप्त झाले.
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 20 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22