bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Revelation 5
Revelation 5
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 6 →
1
जो राजासनावर बसलेला होता, त्याच्या उजव्या हातात दोन्ही बाजूस लिहिलेली व सात शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली.
2
“गुंडाळीवरचे शिक्के फोडून, ती उघडावयास कोण पात्र आहे”, असे मोठ्याने पुकारणारा एक सामर्थ्यशाली देवदूत मी पाहिला.
3
परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता.
4
ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी शोकाकुल झालो.
5
तेव्हा वडीलजनांच्या मंडळापैकी एक जण मला म्हणाला, “शोक करू नको, पाहा, यहुदाच्या वंशाचा सिंह, दावीदचे मूळ ह्याने जय मिळवला आहे म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास समर्थ ठरला आहे.”
6
तेव्हा राजासनाभोवती चार प्राणी व वडीलजनांमध्ये वध करण्यात आल्यासारखे दिसत होते, असे कोकरू उभे राहिलेले मी पाहिले. त्याला सात शिंगे व सात डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत.
7
त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
8
त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडीलजन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत.
9
ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत
10
आणि आमच्या देवासाठी ह्या प्रजेला तू राज्य व याजक असे केले आहे आणि हे लोक पृथ्वीवर राज्य करतील.”
11
तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडीलजन ह्यांच्याभोवती हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांची वाणी ऐकू आली.
12
ते उच्च स्वरात गात होते, “वधलेले कोकरू सामर्थ्य, धन, सुज्ञता, पराक्रम, सन्मान, गौरव व धन्यवाद हे स्वीकारण्यास पात्र आहे!”
13
स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रामध्ये जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे गाताना ऐकले, “राजासनावर बसलेल्याला व कोकराला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम युगानुयुगे असो!”
14
तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि वडीलजनांनी लोटांगण घालून आराधना केली.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22