bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Romans 16
Romans 16
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
1
किंख्रियामधील ख्रिस्तमंडळीची दीक्षित सेविका, आपली बहीण फीबी हिची मी तुमच्याकडे शिफारस करतो.
2
तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल, त्या त्या कामात तिला साहाय्य करावे कारण ती स्वतः पुष्कळ जणांना व मलाही साहाय्य करत आली आहे.
3
ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना शुभेच्छा द्या.
4
त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला, त्यांचे आभार केवळ मीच मानतो, असे नव्हे तर यहुदीतरांच्या सर्व ख्रिस्तमंडळ्याही मानतात.
5
जी ख्रिस्तमंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही माझा नमस्कार कळवा. माझा प्रिय अपैनत ह्याला शुभेच्छा. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम फळ आहे.
6
मरियेला शुभेच्छा, तिने तुमच्यामध्ये फार श्रम केले आहेत.
7
माझे नातेवाईक व सोबतीचे तुरुंगवासी अंद्रोनीक व युनिया ह्यांना शुभेच्छा कळवा, ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तामध्ये होते.
8
प्रभूवरील निष्ठेने माझा प्रिय आंप्लियात ह्याला शुभेच्छा.
9
ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना शुभेच्छा.
10
ख्रिस्तामध्ये निष्ठावंत ठरलेला अपिल्लेस ह्याला शुभेच्छा. अरिस्तबूलच्या कुटुंबीयांना शुभेच्छा.
11
माझा यहुदी बंधू हेरोदियोन ह्याला शुभेच्छा. नार्किसाच्या कुटुंबातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना शुभेच्छा कळवा.
12
प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना शुभेच्छा सांगा. प्रिय पर्सिस हिला शुभेच्छा द्या. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत.
13
प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला आणि मला मातेसमान असलेल्या त्याच्या आईलाही शुभेच्छा कळवा.
14
असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास व हर्मास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे ख्रिस्ती बंधू आहेत त्यांना शुभेच्छा.
15
फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना शुभेच्छा कळवा.
16
बंधुभावपूर्वक चुंबनाने एकमेकांना शुभेच्छा द्या. सर्व ख्रिस्तमंडळ्या तुम्हांला शुभेच्छा पाठवतात.
17
आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला शिक्षण मिळाले आहे, त्याविरुद्ध जे फूट पाडतात व अडथळे आणतात त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा;
18
कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वार्थ साधू पाहतात. गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भावंडांची अंतःकरणे भुलवितात.
19
शुभवर्तमानावरील तुमच्या निष्ठेविषयी सर्वांना माहीत झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही सुज्ञ असावे आणि वाइटाविषयी निष्कपट असावे, अशी माझी इच्छा आहे.
20
शांतिदाता देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह सर्वांवर असो.
21
माझा सहकारी तीमथ्य व माझे यहुदी बंधू लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला शुभेच्छा देतात.
22
हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये शुभेच्छा पाठवतो.
23
माझे व ख्रिस्तमंडळीतील सर्वांचे आतिथ्य करणारा गायस ह्याच्या तुम्हांला शुभेच्छा. नगराचा खजिनदार एरास्त व आमचा बंधू क्वर्त हे तुम्हांला शुभेच्छा पाठवतात.
24
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.
25
आपण देवाचा गौरव करू या. तुम्हांला तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास तो समर्थ आहे. येशू ख्रिस्ताविषयीचे जे शुभवर्तमान मी घोषित करतो त्यानुसार व जे रहस्य गत युगात गुप्त ठेवलेले होते, परंतु आता जे प्रकट करण्यात आले आहे त्यानुसार तो हे करीत आहे.
26
हे सत्य संदेष्ट्यांच्या लेखनाद्वारे उघड करण्यात आले आहे आणि सनातन देवाच्या आज्ञेने ते सर्व राष्ट्रांतील लोकांना कळविण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवावा व आज्ञापालन करावे.
27
एकमेव ज्ञानी देवाचा येशू ख्रिस्ताद्वारे सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16