bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Romans 7
Romans 7
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 8 →
1
बंधुजनहो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यतच नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय?
2
पती जिवंत आहे, तोपर्यत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते. पण पती मरण पावल्यावर तिची पतीच्या बंधनातून सुटका होते.
3
म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली, तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती कायद्याने त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असता व्यभिचारिणी होत नाही.
4
त्याप्रमाणे, बंधुजनहो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात, अशासाठी की, तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला, त्याचे व्हावे आणि देवाच्या सेवेत उपयुक्त ठरावे.
5
आपण देहस्वभावाच्या अधीन होतो, तेव्हा नियमशास्त्राद्वारे चेतविलेल्या पापवासना आपल्या अवयवांत मरणाचे फळ देण्यासाठी कार्य करत होत्या.
6
पण आता ज्याने आपण बद्ध होतो, त्यासंबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, म्हणून जुन्या धर्मशास्त्रलेखास धरून नव्हे तर पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या नवजीवनाने आपण सेवा करतो.
7
तर मग नियमशास्त्र म्हणजेच पाप असे आपण म्हणावे काय? मुळीच नाही! तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. लोभ धरू नको, असे नियमशास्त्रात सांगितले नसते, तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते.
8
परंतु पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्यायोगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला. नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे.
9
पूर्वी मी नियमशास्त्राविरहित जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो.
10
ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावयाचा तिचाच परिणाम माझ्या बाबतीत मरण झाला, असे माझ्या अनुभवास आले.
11
कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले.
12
तर मग नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, न्याय्य व चांगली आहे.
13
म्हणजे जे चांगले आहे, त्याने मला मरण आणले काय? कदापि नाही! हे पापाने केले. पाप ते पापच दिसावे, म्हणून जे चांगले आहे, त्याच्या योगे पाप माझ्या मध्ये मरण घडवणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पापाचे खरे स्वरूप प्रकट व्हावे म्हणून असे झाले.
14
आपणाला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी मात्र मर्त्य मानव असून पापाला गुलाम म्हणून विकलेला आहे,
15
मी काय करतो, ते माझे मलाच कळत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर ज्याचा मला द्वेष वाटतो ते करतो.
16
जे मी इच्छीत नाही, ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो.
17
तर आता ह्यापुढे ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते.
18
मला ठाऊक आहे की, माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.
19
कारण जे चांगले करावेसे मला वाटते, ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही, असे जे वाईट, ते मी करतो.
20
आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते.
21
सत्कृत्य करण्याची इच्छा असतानाही मी मात्र दुष्कृत्याची निवड करतो, हा नियम मला माझ्यामध्ये आढळतो.
22
माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो.
23
परंतु माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
24
किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?
25
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देव हे करतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तर मग माझी अवस्था ही अशी आहे: मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16