bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Romans 9
Romans 9
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 10 →
1
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्याच्या साहाय्याने माझ्याबरोबर साक्ष देते की,
2
मला मोठे दु:ख वाटते व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना होतात.
3
कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे, हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.
4
ते इस्राएली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी वैभव, करारमदार, नियमशास्त्र, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत.
5
महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून युगानुयुगे धन्य असा देव आहे. आमेन.
6
देवाचे वचन व्यर्थ झाले, असे मी म्हणत नाही, इस्राएल वंशांतले ते सर्व इस्राएली आहेत, असे नाही.
7
ते अब्राहामचे पुत्र आहेत म्हणून ती सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसहाकच्याच वंशाला तुझे पुत्र मानले जाईल.
8
म्हणजे देहस्वभावानुसार झालेली मुले देवाची मुले आहेत, असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात;
9
कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते.
10
इतकेच नव्हे, तर रिबकादेखील आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिली व तिच्या दोन मुलांविषयी
11
त्यांनी काही बरे-वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प होता, म्हणजे जो कृत्यामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेनुसार होता, तो पूर्ण व्हावा
12
म्हणून तिला सांगण्यात आले की, मोठा मुलगा धाकट्याची सेवा करील.
13
त्याचप्रमाणे धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, ‘मी याकोबवर प्रीती केली आणि एसावचा द्वेष केला.’
14
तर आपण काय म्हणावे? देवाकडून अन्याय होतो काय? मुळीच नाही!
15
कारण तो मोशेला म्हणतो, ‘ज्या कोणावर मला दया करावयाची आहे, त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करू इच्छितो त्याच्यावर मी करुणा करीन.’
16
ह्यावरून इच्छा बाळगणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यावर काही अवलंबून नाही; तर दया करणाऱ्या देवावर सर्वकाही अवलंबून आहे.
17
धर्मशास्त्रलेख इजिप्तच्या राजाला असे सांगतो, ‘मी तुला राजा केले आहे ते ह्यासाठी की, तुझ्याद्वारे मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.’
18
ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल, त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल, त्याला तो कठीण हृदयाचे करतो.
19
ह्यावर तू मला म्हणशील, “तर मग तो कुणालाही दोष कसा लावू शकतो? कारण त्याच्या संकल्पाच्या आड कोण येऊ शकतो?”
20
हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय?
21
किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय?
22
आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले
23
आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय?
25
होशेयच्या पुस्तकात परमेश्वर हेही म्हणतो: जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन आणि जे राष्ट्र प्रिय नाही त्याला प्रिय म्हणेन
26
आणि असे होईल की, तुम्ही माझे लोक नाही, असे जेथे म्हटले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल.
27
यशयासुद्धा इस्राएलविषयी असे म्हणतो: जरी इस्राएली लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी थोड्याच लोकांचा बचाव केला जाईल;
28
कारण प्रभू पृथ्वीविषयीचा त्याचा न्याय त्वरित आणि निर्णायकरीत्या पूर्ण करील.
29
हे यशयाने पूर्वीच म्हटल्याप्रमाणे आहे: जर सेनाधीश प्रभूने आमच्यांसाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोम नगरासारखे झालो असतो व आमची अवस्था गमोर नगराप्रमाणे झाली असती.
30
तर मग आपण असे म्हणावे की, जे यहुदीतर नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते, त्यांना विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले.
31
परंतु इस्राएली लोक नीतिमत्त्वाच्या नियमशास्त्रामागे लागले होते तरी ते त्या नियमशास्त्रापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत.
32
का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले.
33
त्याप्रमाणे धर्मशास्त्रात लिहिले आहे: पाहा, सीयोनमध्ये मी अडथळ्याचा धोंडा, अडखळण्याचा खडक ठेवतो, लोक त्यावर पडतील. परंतु त्याच्यावर जो विश्वास ठेवील, तो फजित होणार नाही.
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16