bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Chronicles 11
1 Chronicles 11
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 12 →
1
मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे जमा होऊन म्हणू लागले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत;
2
गतकाळी शौल आमच्यावर राजा असताना इस्राएलाची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता; आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की, ‘माझी प्रजा इस्राएल ह्यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”’
3
ह्या प्रकारे इस्राएल लोकांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला आणि परमेश्वराने शमुवेलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा नेमले.
4
नंतर दावीद व सर्व इस्राएल लोक यरुशलेमेस गेले (ह्यालाच यबूस असे म्हणतात); त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत असत.
5
यबूस येथल्या रहिवाशांनी दाविदाला सांगितले की, “तू येथे येऊ नकोस.” तथापि दाविदाने सीयोन नावाचा गड सर केला; त्यालाच दावीदपूर म्हणतात.
6
दावीद म्हणाला, “जो कोणी सर्वांच्या आधी यबूसी लोकांना मार देईल तो मुख्य सेनापती होईल.” सरूवेचा पुत्र यवाब हा प्रथम चढाई करून गेला म्हणून त्याला सेनापती केले.
7
दावीद त्या गडात राहू लागला म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले.
8
त्याने नगराला चोहोकडून म्हणजे मिल्लोपासून सभोवार कोट बांधला आणि यवाबाने बाकीच्या नगराचा जीर्णोद्धार केला.
9
दावीद अधिकाधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर असे.
10
इस्राएलाविषयी परमेश्वर बोलला होता त्यानुसार दाविदाच्या ज्या शूर वीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात साहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत.
11
दाविदाकडे असलेल्या शूर वीरांची नावे ही: हखमोन्याचा पुत्र याशबाम हा तिसांचा1 नायक असून त्याने तीनशे लोकांवर भाला चालवून त्यांना एका प्रसंगी मारून टाकले.
12
त्याच्या खालोखाल अहोही दोदय ह्याचा पुत्र एलाजार हा होता; तो तिघा महावीरांपैकी एक होता.
13
तो पस-दम्मीम2 येथे दाविदाबरोबर होता; तेथे पलिष्ट्यांनी एकत्र होऊन जवाच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले.
14
त्यांनी त्या शेतामध्ये उभे राहून त्याचे रक्षण करून पलिष्ट्यांचा संहार केला; त्या प्रसंगी परमेश्वराने त्यांना मोठा विजय प्राप्त करून देऊन त्यांचा बचाव केला.
15
मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्यात छावणी देऊन होते.
16
त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.
17
दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर किती बरे!”
18
त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतले.
19
तो म्हणाला, “हे माझ्या देवा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून हे आणले आहे.” म्हणून तो ते पिईना. त्या तिघा वीरांनी हे कृत्य केले.
20
यवाबाचा भाऊ अबीशय हा त्या तिघांचा प्रमुख होता; त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले; त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.
21
त्या तिघांमध्ये त्याची महती विशेष होती म्हणून तो त्यांचा नायक झाला; तरी तो पहिल्या तिघांच्या योग्यतेस पोहचला नाही.
22
कबसेल येथला एक मनुष्य होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नावाच्या पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहास ठार केले.
23
मग त्याने पाच हात उंचीच्या एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार केले; त्या मिसर्याच्या हाती साळ्याच्या तुरीसारखा एक भाला होता; पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिसर्याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्या भाल्याने त्याचा वध केला.
24
असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले.
25
त्या तिसांहून त्याची महती विशेष होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही; दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले.
26
सैन्यातील वीर हे: यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमाच्या दोदोचा पुत्र एलहानान,
27
शम्मोथ हरोरी, हेलस पलोनी,
28
इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा, अबियेजेर, अनाथोथी,
29
सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही,
30
महरय नटोफाथी, बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेद,
31
बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी,
32
गाशाच्या ओढ्यांजवळचा हूरय अबीएल अर्बाथी,
33
अजमावेथ बहरूमी, अलीहबा शालबोनी,
34
गिजोनकर हाशेमाचे पुत्र, हरारी शागे ह्याचा पुत्र योनाथान,
35
हरारी साखार ह्याचा पुत्र अहीयाम, ऊराचा पुत्र अलीफल,
36
हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
37
हेस्री कर्मेली, एजबयाचा पुत्र नारय,
38
नाथानाचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार,
39
सेलक अम्मोनी, सरूवेचा पुत्र यवाब ह्याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
40
ईरा इथ्री, गारेब इथ्री,
41
उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद,
42
रऊबेनी शीजा ह्याचा पुत्र अदीना. हा रऊबेन्यांचा सरदार, त्याच्याबरोबर तीस जण असत,
43
माकाचा पुत्र हानान, योशाफाट मिथनी,
44
उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी ह्याचे पुत्र शमामा व यहीएल,
45
शिम्रीचा पुत्र यदीएल व त्याचा भाऊ योहा तीसी,
46
अलिएल महवी व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्या, इथ्मा मवाबी,
47
अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29