bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Chronicles 2
1 Chronicles 2
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 3 →
1
इस्राएलाचे पुत्र हे: रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
2
दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर. यहूदाचे वंशज
3
यहूदाचे पुत्र हे: एर, ओनान व शेला; हे तिघे कनानीण बथ-शूवा हिच्या पोटी त्याला झाले. यहूदाचा ज्येष्ठ पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्याला त्याने जिवे मारले.
4
यहूदाची सून तामार हिच्यापासून त्याला पेरेस व जेरह हे झाले; यहूदाला एकंदर पाच पुत्र झाले.
5
पेरेसाचे पुत्र: हेस्रोन व हामूल;
6
जेरहाचे पुत्र: जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा असे एकंदर पाच.
7
कर्मीचा पुत्र आखान; ह्यानेच समर्पित वस्तूसंबंधाने आगळीक करून इस्राएलास क्लेश दिला.
8
एथानाचा पुत्र अजर्या.
9
हेस्रोनास झालेले पुत्र यरहमेल, राम व कलुबाय हे होत.
10
रामास अम्मीनादाब झाला आणि अम्मीनादाबास यहूदा वंशाचा सरदार नहशोन हा झाला;
11
नहशोनाला सल्मा झाला, व सल्माला बवाज झाला;
12
बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला;
13
इशायाचा ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमा,
14
चवथा नथनेल, पाचवा रदाय,
15
सहावा ओसेम व सातवा दावीद हे पुत्र झाले;
16
व त्यांच्या बहिणी सरूवा व अबीगईल ह्या होत. सरूवेचे अबीशय, यवाब व असाएल असे तिघे पुत्र होते.
17
अबीगईलीस अमासा झाला. अमासाचा बाप येथेर इश्माएली हा होता.
18
कालेब बिन हेस्रोन ह्याला त्याच्या बायका अजूबा व यरियोथ ह्यांच्यापासून संतती झाली. अजूबेचे पुत्र येशेर, शोबाब व अर्दोन हे होत.
19
अजूबा मेल्यावर कालेबाने एफ्राथेशी लग्न केले, तिच्या पोटी त्याला हूर झाला.
20
हूरास ऊरी झाला व ऊरीस बसालेल झाला.
21
नंतर हेस्रोन हा गिलादाचा बाप माखीर ह्याच्या कन्येपाशी गेला; तो साठ वर्षांचा असता त्याने तिच्याशी लग्न केले व तिच्या पोटी त्याला सगूब झाला.
22
सगूबास याईर झाला; ह्याची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
23
गशूर व अराम ह्यांनी त्यांच्यापासून हव्वोथयाईर व कनाथ आणि त्यांच्या आसपासची खेडीपाडी अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली. गिलादाचा बाप माखीर ह्याची ही संतती होय.
24
हेस्रोन हा कालेब-एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची बायको अबीया हिच्या पोटी त्याला तकोवाचा बाप अश्हूर हा झाला.
25
हेस्रोनाचा ज्येष्ठ पुत्र यरहमेल ह्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र राम, बुना, ओरेम, ओसेम व अहीया हे होत.
26
यरहमेलाची अटारा नावाची दुसरी एक बायको होती; ती ओनाम ह्याची आई होय.
27
यरहमेलाचा ज्येष्ठ पुत्र राम ह्याचे पुत्र: मास, यामीन व एकर.
28
ओनामाचे पुत्र: शम्मय व यादा; शम्मयाचे पुत्र: नादाब व अबीशूर.
29
अबीशूराच्या बायकोचे नाव अबीहाईल असे होते; तिच्या पोटी त्याला अहबान व मोलीद हे झाले.
30
नादाबाचे पुत्र; सलेद व अप्पईम; सलेद निपुत्रिक मेला.
31
अप्पईमाचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानाचा पुत्र अहलय.
32
शम्मयाचा भाऊ यादा ह्याचे पुत्र: येथेर व योनाथान; येथेर हा निपुत्रिक मेला.
33
योनाथानाचे पुत्र: पेलेथ व जाजा. यरहमेलाची संतती ही.
34
शेशानास पुत्र नव्हते; कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक मिसरी चाकर होता.
35
शेशानाने आपली कन्या, आपला चाकर यरहा ह्याला दिली; तिच्या पोटी त्याला अत्ताय झाला.
36
अत्तायास नाथान झाला, नाथानास जाबाद झाला;
37
जाबादास एफ्लाल झाला; एफलालास ओबेद झाला;
38
ओबेदास येहू झाला, येहूस अजर्या झाला;
39
अजर्यास हेलस झाला, हेलसाला एलासा झाला;
40
एलासाला सिस्माय झाला, सिस्मायास शल्लूम झाला;
41
शल्लूमास यकम्या झाला; यकम्यास अलीशामा झाला.
42
यरहमेलाचा भाऊ कालेब ह्याचा ज्येष्ठ पुत्र जीफाचा बाप मेशा; हेब्रोनाचा बाप मारेशा ह्याचा वंशही त्याच्यापासूनच झाला.
43
हेब्रोनाचे पुत्र: कोरह, तप्पूर, रेकेम व शमा.
44
शमास रहम झाला. तो यर्कामाचा बाप; रेकेमास शम्मय झाला.
45
शम्मयाचा पुत्र मावोन; मावोन बेथसूराचा बाप.
46
कालेबाची उपपत्नी एफा हिला हारान, मोसा व गाजेज हे झाले; हारानास गाजेज झाला.
47
यादायाचे पुत्र: रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ.
48
कालेबाची उपपत्नी माका हिला शेबेर व तिर्हना हे झाले.
49
ह्यांशिवाय तिला मद्मानाचा बाप शाफ, आणि मखबेना व गिबा ह्यांचा बाप शवा हे झाले; कालेबाची कन्या अखसा.
50
ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर, ह्याचा पुत्र किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल हा होता.
51
सल्मा हा बेथेलहेमाचा बाप; हारेफ हा बेथगादेराचा बाप.
52
किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल ह्याच्या वंशात हारोवे व अर्धे मनुहोथवासी हे झाले.
53
किर्याथ-यारीम ह्याची कुळे: इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई; ह्यांच्यापासून सराथी व एष्टाबुली ही निघाली.
54
सल्माचे वंशज: बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-यवाब, आणि अर्धे मानहतवासी म्हणजे सारी;
55
आणि याबेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे तिराथी, शिमाथी व सुकाथी; ही रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथ ह्याच्या वंशातली केनी कुळे होत.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29