bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Chronicles 17
1 Chronicles 17
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 18 →
1
दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्ट्याला म्हटले, ‘पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे.”
2
नाथान दाविदाला म्हणाला, “तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे.”
3
त्याच रात्री देवाचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे:
4
“माझा सेवक दावीद ह्याला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधायचे नाही.
5
ज्या दिवशी इस्राएल लोकांना मी मिसर देशातून बाहेर काढले तेव्हापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे.
6
जिकडे-जिकडे मी इस्राएल लोकांसह भ्रमण करीत आलो तिकडे-तिकडे ज्या कोणा इस्राएल शास्त्यांना माझ्या लोकांचे पालन करण्याविषयी मी आज्ञा करीत असे त्यांना तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक शब्द तरी कधी मी बोललो आहे काय?’
7
तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्या प्रजेचा, इस्राएलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून, मेंढरांमागे चालत असताना आणले,
8
जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे थोर पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे मी तुझे नाव करीन.
9
मी आपल्या इस्राएलासाठी एक स्थान नेमून देईन, मी तेथे त्यांना रोवीन; म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व तेथून पुढे कधी ढळणार नाहीत;
10
इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून दुर्जन जसे त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड केला आहे. मी तुला म्हणत आहे की, परमेश्वर तुझे घराणे कायमचे स्थापील.
11
तुझे दिवस पुरे झाले व तू जाऊन आपल्या पितरांजवळ निजलास म्हणजे तुझ्या पुत्रांपासून निर्माण होणार्या संतानाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन.
12
तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील व मी त्याचे राजासन निरंतरचे स्थापीन.
13
मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; तुझ्यापूर्वीच्या राजावरची कृपादृष्टी जशी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी मी दूर करणार नाही;
14
माझ्या मंदिरात व माझ्या राज्यात मी त्याची निरंतरची स्थापना करीन; त्याची गादी निरंतरची स्थापित होईल.”’
15
ही सर्व वचने व दर्शने जशीच्या जशी नाथानाने दाविदाला कळवली.
16
मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, “हे परमेश्वरा देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणले आहेस?
17
हे देवा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्याच काळाचे सांगून ठेवले आहेस; हे परमेश्वरा देवा, उच्च पदावरल्या मनुष्याप्रमाणे तू मला लेखत आहेस.
18
तू आपल्या सेवकाचा जो मान केला आहेस त्याबद्दल दावीद आणखी काय बोलणार? कारण तू आपल्या सेवकाला ओळखतोस.
19
हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाप्रीत्यर्थ व तुझ्या मनोदयाप्रमाणे ह्या सगळ्या महान गोष्टी मला कळाव्यात म्हणून हे महत्कार्य तू केले आहेस.
20
हे परमेश्वरा, जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्या सर्वांवरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.
21
तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी त्यांचा उद्धार करायला देव स्वतः गेला, ह्यासाठी की जी तुझी प्रजा तू मिसर देशातून सोडवलीस तिच्यादेखत मोठी व भयानक कृत्ये करून व इतर राष्ट्रांना घालवून देऊन तू आपले नाव करावेस.
22
तू आपले लोक इस्राएल ह्यांना तुझी निरंतरची प्रजा केले आहेस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास.
23
तर आता हे परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्यांविषयी जे वचन तू दिले ते कायमचे सिद्धीस ने व आपल्या म्हणण्याप्रमाणे कर.
24
‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे, तो इस्राएलाप्रीत्यर्थ देव आहे, आणि तुझा सेवक दावीद ह्याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित आहे,’ असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाची स्थापना करून त्याचा निरंतर महिमा वाढवावा.
25
कारण, हे माझ्या देवा, तू आपल्या सेवकाला कळवले आहेस की मी तुझे घराणे स्थापीन,1 म्हणून तुला विनंती करण्याची हिंमत तुझ्या सेवकाला आली.
26
आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तू आपल्या सेवकाचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहेस;
27
तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास तू अशी बरकत दिली आहेस की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहावे, कारण हे परमेश्वरा, तूच त्याचे अभीष्ट केले आहेस व ते निरंतर धन्य झाले आहे.”
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 18 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29