bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Hebrews 12
Hebrews 12
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 13 →
1
तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे;
2
आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.
3
तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.
4
तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.
5
आणि तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? “माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस;
6
कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.”
7
शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवतो, आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे?
8
ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षेवाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासीपुत्र आहात.
9
शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय?
10
त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करत होते; पण तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो.
11
कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.
12
म्हणून ‘लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा,’
13
आणि ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा,’ ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.
14
सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’
15
देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या.
17
तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करत असताही त्याचा नाकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चात्तापाची संधी त्याला मिळाली नाही.
18
स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ,
19
कर्ण्याचा नाद व शब्दध्वनी ह्यांच्याजवळ तुम्ही आला नाहीत; तो ध्वनी ऐकणार्यांनी विनंती केली की, त्याच्या योगे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये.
20
कारण “पशूदेखील पर्वताला शिवला तर त्याला धोंड्यांनी मारावे,” अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली.
21
आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “‘मी अति भयभीत’ व कंपित ‘झालो आहे.”’
22
पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,
23
स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,
24
नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे.
25
जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.
26
त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की, “‘आणखी एकदा मी’ केवळ ‘पृथ्वी’ नव्हे तर ‘आकाशही कापवीन.”’
27
“आणखी एकदा” ह्याचा अर्थ असा होतो की, घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात.
28
म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक1 होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू;
29
कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13