bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Hebrews 3
Hebrews 3
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 4 →
1
म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक2 ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा.
2
जसा, ‘मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय’ होता तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता.
3
कारण ज्या मानाने घर बांधणार्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे.
4
कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्वकाही बांधणारा देवच आहे.
5
जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी ‘त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता.’
6
ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता, आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत.
7
ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, “‘आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
8
तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.
9
तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’
10
त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, ‘हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.”’
11
म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.’
12
बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.
13
जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये.
14
कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.
15
शास्त्रात असे म्हटले आहे, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.”
16
कारण ऐकूनही कोणी ‘चीड आणली’? मोशेच्या द्वारे मिसरातून निघालेले सर्वच नव्हेत काय?
17
आणि ‘चाळीस वर्षे तो कोणावर ‘संतापला’? ज्यांनी पाप केले, ‘ज्यांची प्रेते रानात पडली,’ त्यांच्यावर नव्हे काय?
18
आणि ‘शपथ वाहून’ तो कोणाला म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही?
19
तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13