bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Hebrews 6
Hebrews 6
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
1
तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चात्ताप, देवावरचा विश्वास,
2
आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, हा पाया पुन्हा न घालता, आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.
3
देव होऊ देईल तर हे आपण करू.
4
कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले,
5
आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणार्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली,
6
ते जर पतित झाले तर त्यांना पश्चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात.
7
कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणार्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो.
8
पण जी भूमी काटेकुसळे उपजवते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट जाळण्यात आहे.
9
जरी आम्ही असे बोलतो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे.
10
कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.
11
आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी;
12
म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.
13
देवाने अब्राहामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटले की,
14
“मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.”
15
त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला.
16
माणसे आपणांपेक्षा मोठ्याची शपथ वाहतात; आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे.
17
म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला,
18
ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.
19
ती आशा आपल्या जिवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ ‘पडद्याच्या आतल्या भागी पोहचणारी’ आहे.
20
‘तेथे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा’ प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13