bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Hebrews 8
Hebrews 8
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 9 →
1
सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडे बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे.
2
तो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर ‘प्रभूने घातलेल्या’ खर्या ‘मंडपाचा’ सेवक आहे.
3
प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्यास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे.
4
तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत.
5
“पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही, जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात.
6
तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे.
7
कारण तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता.
8
लोकांना दोष लावून तो म्हणतो, “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;
9
मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत, आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.
10
कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील.
11
तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला, आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला, शिकवणार नाही. कारण त्यांतील लहानांपासून थोरांपर्यंत ते सर्व मला ओळखतील;
12
कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.”
13
त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13