bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Zechariah 4
Zechariah 4
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 5 →
1
मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत माझ्याकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करतात तसे त्याने मला जागे केले.
2
त्याने मला विचारले, “तुझ्या दृष्टीस काय पडते?” मी म्हणालो, “माझ्या दृष्टीस असे पडते की, एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला सात दिवे आहेत व त्याच्यावरील सात दिव्यांना सात नळ्या आहेत.
3
आणि त्याच्याजवळ कटोर्याच्या उजव्या व डाव्या बाजूंना दोन जैतुनाची झाडे आहेत.”
4
तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्या दिव्यदूताला मी विचारले, “माझ्या प्रभो, ही काय आहेत?
5
माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, “ही काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय?” मी म्हणालो, “नाही, माझ्या स्वामी.”
6
तेव्हा त्याने मला उत्तर केले, “जरूब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे: बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
7
हे महान पर्वता, तू काय आहेस? जरूब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो ‘त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह,’ असा गजर करत कोनशिला पुढे आणील.”
8
मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की,
9
“जरूब्बाबेलच्या हातांनी ह्या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधायचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तू समजशील.
10
तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय? ते सात डोळे जरूब्बाबेलच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील; ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात.”
11
मग मी त्याला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूंना ही दोन जैतुनाची झाडे आहेत ती काय?”
12
दुसर्यांदा मी त्याला विचारले, “ह्या दोन सुवर्णाच्या तोट्यांजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्रवणार्या ह्या दोन जैतुनाच्या फांद्या काय आहेत?”
13
त्याने मला म्हटले, “त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय?” मी म्हटले, “नाही, माझ्या स्वामी.”
14
तेव्हा त्याने म्हटले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्त आहेत.”
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14