bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Zechariah 6
Zechariah 6
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 7 →
1
पुन्हा मी आपले डोळे वर केले तेव्हा पाहा, दोन पर्वतांमधून चार रथ येत आहेत असे दिसले; ते पर्वत पितळेचे होते.
2
पहिल्या रथाला तांबडे घोडे होते; दुसर्या रथाला काळे घोडे होते;
3
तिसर्या रथाला पांढरे घोडे होते व चौथ्या रथाला कबरे लालसर घोडे होते.
4
तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्या दिव्यदूताला मी विचारले, “माझ्या स्वामी, हे काय आहेत?”
5
दिव्यदूताने मला उत्तर केले, “हे आकाशातले चार वारे1 आहेत; ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत.
6
काळे घोडे असलेला रथ उत्तर देशाकडे जात आहे; पांढरे घोडे त्यांच्या मागून (पश्चिम देशाकडे) जात आहेत; कबरे घोडे दक्षिण देशाकडे जात आहेत.”
7
तांबडे घोडेही बाहेर गेले; त्यांचा पृथ्वीभर फिरण्याचा रोख होता; त्यांना तो म्हणाला, “चला, पृथ्वीवर फिरा.” तेव्हा ते पृथ्वीवर फिरले.
8
मग त्याने मला हाक मारून म्हटले, “पाहा, उत्तर देशाकडे जाणार्यांनी उत्तर देशात माझा आत्मा शांत केला आहे.”
9
मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
10
“बंदिवासातून आलेल्या लोकांपैकी हेल्दय, तोबीया व यदया ह्यांच्या माणसांना बरोबर घे; ते बाबेलहून येऊन सफन्याचा पुत्र योशीया ह्याच्या घरी उतरले आहेत, तेथे आजच्या आज जा.
11
सोनेरुपे घेऊन मुकुट घडव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक ह्याच्या मस्तकी घाल.
12
त्याला सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, एक पुरुष, ज्याचे नाव कोंब असे आहे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.
13
तोच परमेश्वराचे मंदिर बांधील; तो वैभवशाली होईल; तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल; ह्या दोहोंत शांततेची सल्लामसलत होईल.”’
14
तो मुकुट हेलेम,2 तोबीया, यदया व सफन्याचा पुत्र हेन ह्यांचे परमेश्वराच्या मंदिरात स्मारक होईल.
15
“मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तुम्हांला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव ह्याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14