bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Zechariah 7
Zechariah 7
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 8 →
1
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी असे झाले की, नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चतुर्थीला परमेश्वराचे वचन जखर्याला प्राप्त झाले.
2
तेव्हा बेथेलकरांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांचे लोक ह्यांना परमेश्वराचा अनुग्रह मागण्यास,
3
आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्टे ह्यांना असे विचारण्यास पाठवले की, “आम्ही वर्षानुवर्ष करत आलो तसे पाचव्या महिन्यात एकान्ती बसून रुदन करावे काय?”
4
मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
5
“तू ह्या देशातील सर्व लोकांना व याजकांना विचार: तुम्ही सत्तर वर्षे पाचव्या व सातव्या महिन्यात उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय?
6
तुम्ही खातापिता तेव्हा आपल्यासाठीच खातपीत नाही काय?
7
यरुशलेम वसलेले व आबादीआबाद होते आणि त्याच्या सभोवतालची गावे, तसेच दक्षिणदेश व तळवट ह्यांत वस्ती होती तेव्हा परमेश्वराने पूर्वीच्या आपल्या संदेष्ट्याच्या द्वारे जी वचने पुकारून सांगितली ती ही नव्हत काय?”
8
मग परमेश्वराचे वचन जखर्यास प्राप्त झाले की,
9
“सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे: तुम्ही खरा न्याय करा व एकमेकांना प्रेम व करुणा दाखवा,
10
आणि विधवा, अनाथ, परके व निराश्रित ह्यांच्यावर जुलूम करू नका व आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका.”
11
पण ते ऐकेनात, त्यांनी मान ताठ केली व ऐकू नये म्हणून कान बंद केले.
12
पूर्वीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठवलेले नियमशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले; ह्यास्तव सेनाधीश परमेश्वराचा त्यांच्यावर मोठा कोप झाला.
13
तेव्हा असे झाले की, “मी हाक मारीत असता त्यांनी ऐकले नाही, म्हणून ते हाक मारतील तरी मी ऐकणार नाही,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
14
“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14