bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Zechariah 8
Zechariah 8
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 9 →
1
मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2
“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोनेसंबंधाने मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे; तिच्याकरता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्त झालो आहे.
3
परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.
4
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, म्हातारे व म्हातार्या, यरुशलेमेच्या गल्ल्यांत आपल्या वृद्धापकाळामुळे हातात काठी घेऊन बसतील.
5
नगराच्या गल्ल्यांनी खेळ खेळणार्या मुलामुलींची गर्दी होईल.
6
सेनाधीश परमेश्वर म्हणतो: त्या दिवसांत ह्या अवशिष्ट राष्ट्रांना ही गोष्ट अचंब्याची वाटते म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
7
सेनाधीश परमेश्वर म्हणतो: मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करीन;
8
मी त्यांना घेऊन येईन व ते यरुशलेमेत वस्ती करतील आणि सत्याने व न्यायीपणाने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.”
9
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “सेनाधीश परमेश्वराचे मंदिर बांधावे म्हणून त्याचा पाया घातला त्या वेळच्या संदेष्ट्यांची ही वचने ह्या दिवसांत जे तुम्ही ऐकत आहात, ते तुम्ही आपले हात दृढ करा.
10
त्या दिवसांपूर्वी माणसास मजुरी मिळत नसे, पशूबद्दल भाडे मिळत नसे व येणार्याजाणार्यास शत्रूमुळे स्वास्थ्य मिळत नसे; कारण माणसांनी एकमेकांवर उलटावे असे मी केले.
11
मी पूर्वी होतो तसा ह्या अवशिष्ट लोकांबरोबर असणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
12
शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. ह्या अवशिष्ट लोकांना मी ह्या अवघ्यांचे वतन देईन.
13
हे यहूदाच्या घराण्या व इस्राएलाच्या घराण्या, असे होईल की, जे तुम्ही राष्ट्रांत शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल; भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत.”
14
कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला, तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजले ह्याविषयी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो;
15
त्याप्रमाणे ह्या दिवसांत यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजले आहे; भिऊ नका;
16
तुम्ही करायचे ते हेच की, तुम्ही सर्व आपल्या शेजार्याबरोबर खरे बोला; आपल्या वेशीत खरेपणाने वागा व शांतिदायक न्याय करा;
17
तुम्ही कोणी मनात आपल्या शेजार्याचे अनिष्ट चिंतू नका; खोट्या शपथेची आवड धरू नका; कारण ह्या सर्वांचा मला तिटकारा आहे, असे परमेश्वर म्हणतो.
18
सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
19
“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, चौथ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील; ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील; म्हणून सत्य व शांती ह्यांची आवड धरा.
20
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: राष्ट्रे व अनेक नगरांचे रहिवासी येतील अशी वेळ येईल;
21
एका नगराचे रहिवासी दुसर्या नगरास जाऊन म्हणतील, ‘आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू व सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू; मीही जातो.’
22
पुष्कळ लोक व असमर्थ राष्ट्रे यरुशलेमेत सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास व परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील.
23
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणार्या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुमच्याबरोबर येतो, कारण देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”’
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14