bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 Corinthians 1
1 Corinthians 1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
1
करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यासाठी बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना,
2
देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून:
3
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला लाभो.
4
ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेमुळे मी तुमच्याविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो;
5
कारण जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढ झाली, तसतसे तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत, अगदी बोलण्यात व ज्ञानातदेखील, संपन्न झालात.
7
परिणामी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.
8
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच तुम्हांला शेवटपर्यत दृढ राखील.
9
ज्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याबरोबरच्या सहभागात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.
10
बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हां सर्वांचे बोलणे ऐक्याचे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये. तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले असावे.
11
कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत, असे मला “लोवेच्या कुटुंबातील काही माणसांकडून कळले आहे.
12
माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा”, “मी अपुल्लोसचा”, “मी पेत्राचा” आणि “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे”, असे म्हणतो.
13
ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी क्रुसावर चढवले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?
14
क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणालाही बाप्तिस्मा मी दिला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो.
15
नाही तर, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने दिला गेला, असे कोणी म्हणावयाचा!
16
आणखी मी स्तेफनच्या घरच्यांनाही बाप्तिस्मा दिला. त्यांच्याखेरीज मी दुसऱ्या कोणाला बाप्तिस्मा दिला की नाही, हे माझ्या लक्षात नाही.
17
ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा देण्यास नव्हे तर शुभवर्तमान घोषित करायला पाठविले, पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून क्रुसाविषयी वाक्चातुर्याने सांगण्यास मला पाठवले नाही.
18
कारण ज्यांचा नाश होत आहे, त्यांना क्रुसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे, अशा आपल्यासाठी तो देवाचे सामर्थ्य आहे, कारण
19
‘मी ज्ञानवंतांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिवंतांची बुद्धी शून्यवत करीन’, असा धर्मशास्त्रलेख आहे.
20
तर मग ज्ञानी कोठे राहिले? धर्मशास्त्र कोठे राहिले? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले आहे!
21
जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे.
22
यहुदी लोक चमत्कारांचा पुरावा मागतात व ग्रीक ज्ञानाचा शोध करतात,
23
परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा,
24
मात्र पाचारण झालेल्या यहुदी व ग्रीक अशा दोघांनाही तो संदेश म्हणजे स्वतः ख्रिस्त आहे, तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे.
25
कारण देवाचा मूर्खपणा, माणसांच्या शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञ आहे आणि देवाची दुर्बलता माणसांच्या शक्तीपेक्षा अधिक बळकट आहे.
26
तर बंधुजनहो, तुम्हांला झालेल्या पाचारणाचा विचार करा. तुमच्यामध्ये पुष्कळ जण जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे नाहीत.
27
तरी ज्ञानी लोकांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख ते निवडले आणि बलवानांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले
28
आणि जगातील ज्या क्षुल्लक, तिरस्करणीय व नगण्य गोष्टी देवाने ह्याच्यासाठी निवडल्या की, जे अस्तित्वात आहे ते त्याने शून्यवत करावे,
29
म्हणजे देवासमोर कोणीही बढाई मारू नये.
30
तो आपल्यासाठी देवाचे ज्ञान, नीतिमत्त्व, पवित्रीकरण आणि तारण झाला आहे. देवामुळे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात.
31
म्हणजे ‘जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूविषयी तो बाळगावा’ ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16