bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 Corinthians 4
1 Corinthians 4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
1
आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्यांचे कारभारी आहोत, असे प्रत्येकाने आम्हांला मानावे.
2
कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.
3
आता तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला महत्त्व वाटत नाही. मी स्वतःचादेखील न्यायनिवाडा करत नाही.
4
माझी सदसद्विवेकबुद्धी शुद्ध असली, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.
5
म्हणून उचित समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची प्रशंसा करील.
6
बंधुजनहो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी उदाहरणादाखल स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत. ह्यासाठी की, धर्मशास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये. हा धडा तुम्ही आमच्याकडून शिकावा, म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकाच्या तुलनेत दुसऱ्याचा अभिमान बाळगणार नाही.
7
तुला इतरांपेक्षा श्रेष्ठ कोणी केले? जे तुला दिलेले नाही, असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अहंकार तू का बाळगतोस?
8
तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्ही जरी राजे झालो नसलो, तरी तुम्ही मात्र राजे झाला आहात काय? तुम्ही राजे बनलाच असता, तर ठीक झाले असते; कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.
9
मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना सर्वात शेवटच्या स्थानी जणू काही मरणदंडासाठी पुढे केले आहे. कारण आम्ही जगाला, देवदूतांना व माणसांना, जाहीर प्रदर्शन असे झालो आहोत!
10
आम्ही ख्रिस्ताकरिता मूर्ख, परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत शहाणे, आम्ही अशक्त, परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत सशक्त, आम्ही अप्रतिष्ठित परंतु तुम्ही प्रतिष्ठित असे आहात!
11
ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत. आम्हांला मारहाण होते, आम्हांला घरदार नाही.
12
आम्ही आपल्याच हातांनी काम करून थकतो. आम्हांला शाप दिले असता आम्ही आशीर्वाद देतो. आमचा छळहोत असता, आम्ही तो सहन करतो.
13
आमची निंदा होत असता आम्ही शुभेच्छा देतो, आम्ही जगाचा केरकचरा, अगदी खालच्या थरातला गाळ असे आजपर्यंत झालो आहोत.
14
तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो;
15
कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार प्रशिक्षक असले तरी पुष्कळ पालक नाहीत. मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूवरील निष्ठेमुळे शुभवर्तमानाच्या योगाने जन्म दिला आहे.
16
म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.
17
ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवत आहे. तो ख्रिस्ती जीवनामध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. जसे मी सर्वत्र प्रत्येक ख्रिस्तमंडळींत शिकवितो, त्याप्रमाणे तो ख्रिस्तामध्ये माझ्या जीवनशैलीची तुम्हांला आठवण करून देईल.
18
मी तुमच्याकडे येणार नाही, असे समजून कित्येक अहंकारी बनले आहेत.
19
जर प्रभूची इच्छा असली, तर मी तुमच्याकडे लवकरच येईन. तेव्हा गर्विष्ठांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन;
20
कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे.
21
तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्य वृत्तीने यावे?
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16