bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 Corinthians 10
1 Corinthians 10
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 11 →
1
बंधुजनहो, आपले पूर्वज मेघाखाली होते आणि तांबड्या समुद्रातून ते सर्व पार गेले, ह्याची आपण आठवण ठेवावी, अशी माझी इच्छा आहे.
2
मेघात व समुद्रात मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वांना बाप्तिस्मा देण्यात आला.
3
त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले
4
आणि ते सर्व एकाच प्रकारचे आध्यात्मिक पाणी प्यायले कारण ते त्यांच्याबरोबर जात असलेल्या आध्यात्मिक खडकांतून पीत होते. तो खडक तर स्वतः ख्रिस्त होता.
5
तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला.
6
ह्या गोष्टी आपल्यासाठी उदाहरणादाखल घडल्या. अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये.
7
त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. ‘लोक खायला प्यायला बसले, नंतर धुंद होऊन लैंगिक गैरवर्तन करायला उठले’, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.
8
त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले, म्हणून आपण जारकर्म करू नये.
9
त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सर्पदंशाने नाश पावले. म्हणून आपण त्यांच्यासारखी प्रभूची परीक्षा पाहू नये.
10
त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, म्हणून तशी कुरकुर आपण करू नये.
11
ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या व आपल्याला इशारा देण्यासाठी त्या लिहून ठेवण्यात आल्या आहेत कारण आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहचलो आहोत.
12
म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.
13
लोकांना सर्वसाधारणपणे ज्या कसोटीतून जावे लागते अशाच प्रकारची कसोटी तुमच्यावर गुदरलेली आहे. देव विश्वसनीय आहे, तो तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडे पाहणार नाही, तर ती सहन करायला तुम्हांला समर्थ करील व अशा प्रकारे कसोटीबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही दाखवील.
14
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.
15
तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो, मी काय म्हणतो त्याचा निर्णय तुम्हीच करा.
16
जो प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्तामधील सहभाग नाही काय? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीरामधील सहभागिता नाही काय?
17
भाकर एक असल्यामुळे, आपण जरी अनेक असलो तरी त्या एका भाकरीत सहभागी झाल्यामुळे, आपण एक शरीर असे आहोत.
18
जे जात्याच इस्राएली आहेत त्यांच्याकडे पाहा: यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार असतात ना?
19
तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य महत्त्वाचा की, मूर्ती महत्त्वाची?
20
तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करतात. तुम्ही भुतांचे भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही.
21
तुम्ही प्रभूचा प्याला व भुतांचा प्याला पिऊ शकत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भुतांच्या मेजावरचे तुम्ही खाऊ शकत नाही.
22
आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?
23
ज्या गोष्टींची मला कायद्याने मुभा दिली आहे त्या सर्व गोष्टी माझ्या हिताच्या असतीलच असे नाही. सर्व गोष्टींची मला मुभा आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.
24
कोणीही स्वत:चे हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
25
बाजारात खाटिक जे काही विकतात ते कोणतेही प्रश्न न विचारता सदसद्विवेकबुद्धीने तुम्ही खाऊ शकता;
26
कारण पवित्र शास्रात म्हटल्याप्रमाणे, पृथ्वी व तिच्यात जे काही भरले आहे, ते परमेश्वराचे आहे.
27
विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी कोणी तुम्हांला जेवायला बोलावले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतात ते कोणतेही प्रश्न न विचारता सदसद्विवेकबुद्धीने स्वीकारा.
28
परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेकबुद्धीखातर तो स्वीकारू नका.
29
येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुमची नव्हे तर तुम्हांला आमंत्रण देणाऱ्याची. माझ्या स्वातंत्र्याचा निर्णय दुसऱ्याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा, असे एखादा विचारील.
30
मी आभारपूर्वक स्वीकारत असेन, तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याबद्दल माझ्यावर टीका का व्हावी?
31
तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता, ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.
32
यहुदी, ग्रीक व देवाची ख्रिस्तमंडळी ह्यांच्यापैकी कोणाच्याही मनात संदेह निर्माण करणारे होऊ नका,
33
तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16