bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 Corinthians 8
1 Corinthians 8
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 9 →
1
आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी तुम्ही जे लिहिले होते, त्याच्याकडे मी वळतो. आपल्या सर्वांना ज्ञान आहे, असे म्हटले जाते, हे खरे आहे. असे ज्ञान अहंकार निर्माण करते परंतु प्रीती प्रगती साधत असते.
2
जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे, त्याप्रमाणे त्याला त्याचे आकलन झालेले नसते.
3
मात्र जो देवावर प्रीती करतो, त्याला देव ओळखतो.
4
मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, जे खरोखर अस्तित्वात नाही त्याचे प्रतिनिधित्व मूर्ती करीत असते आणि एकाखेरीज दुसरा देव नाही.
5
ज्यांना देव म्हणून मानतात अशी स्वर्गात किंवा पृथ्वीवर बरीच दैवते व बरेच प्रभू असतील,
6
तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याने सर्व काही निर्माण केले व आपण त्याच्यासाठी जगतो आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले व आपण त्याच्या कृपेने जगतो.
7
तथापि हे ज्ञान सर्वांना असते असे नाही, तर कित्येकांवर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेले खाद्य नैवेद्य म्हणून खातात, तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बल असल्यामुळे ती विटाळते.
8
देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही; न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही.
9
मात्र हे तुमचे स्वातंत्र्य दुर्बळास अडथळ्याचे कारण होऊ नये म्हणून जपा.
10
जाणकार असलेल्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले व तो पाहणारा दुर्बल असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना?
11
ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला, असा जो दुर्बल बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाने नाश होईल.
12
बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बल सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.
13
म्हणून अन्नामुळे माझा बंधू पापात पडत असेल, तर तो पापात पडू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16