bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Acts 10
Acts 10
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 11 →
1
कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा एक पुरुष इटालियन नावाच्या पलटणीत अधिकारी होता.
2
तो धार्मिक होता व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, पुष्कळ दानधर्म करणारा व देवाचा नित्य धावा करणारा होता.
3
त्याने एकदा दुपारी तीनच्या सुमारास दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपल्याकडे देवाचा दूत येत असून, “कर्नेल्य”, अशी आपल्याला हाक मारत आहे.
4
तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?”, त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व दानधर्म हे देवापुढे आठवणीसाठी पोहचले आहेत व तो तुला उत्तर देणार आहे.
5
आता तू यापो येथे माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण. त्याला पेत्रही म्हणतात.
6
तो शिमोन नावाच्या, चर्मकाराच्या घरी उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.”
7
जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता, तो निघून गेल्यानंतर त्याने त्याच्या घरच्या दोघा चाकरांना व त्याच्या व्यक्तिगत सेवेसाठी नेमलेल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले
8
आणि त्यांना सर्व सविस्तर माहिती देऊन यापो या गावी पाठवले.
9
दुसऱ्या दिवशी ते गावाजवळ आले, तेव्हा मध्यान्हीच्या वेळी पेत्र प्रार्थना करावयास छपरावर गेला,
10
त्याला भूक लागून काही खावेसे वाटले पण जेवणाची तयारी होत आहे, इतक्यात त्याला गाढ तंद्री लागली.
11
आकाश उघडले आहे व मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे, असा त्याने दृष्टान्त पाहिला.
12
त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पक्षी होते.
13
त्याला अशी वाणी ऐकू आली की, “पेत्रा, ऊठ, मारून खा.”
14
परंतु पेत्र म्हणाला, “नको, प्रभो, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.”
15
दुसऱ्यांदा त्याला वाणी ऐकू आली, “देवाने जे शुद्ध केले आहे. ते तू निषिद्ध मानू नकोस.”
16
असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
17
आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा, ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्यने पाठवलेली माणसे शिमोनचे घर शोधत त्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभी राहिली,
18
त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?”
19
पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता पवित्र आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध घेत आहेत.
20
ऊठ, खाली जा आणि मनात काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे.”
21
पेत्र खाली येऊन त्या माणसांना म्हणाला, “पाहा, ज्याचा तुम्ही शोध घेत आहात तो मी आहे. तुम्ही येथे कशाकरिता आला आहात?”
22
ते म्हणाले, “रोमन अधिकारी कर्नेल्य हा सद्गृहस्थ असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याला आदरणीय मानतात. त्याला पवित्र देवदूताने सुचविले आहे की, आपल्याला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”
23
पेत्राने त्यांना आत बोलावून त्यांना रात्रभर तेथे ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापो येथील बंधुजनांपैकी काही जण त्याच्याबरोबर गेले.
24
दुसऱ्या दिवशी तो कैसरिया येथे पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांस व इष्टमित्रांस जमवून त्याची वाट पाहत होता.
25
पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले.
26
पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभा राहा, मीही मनुष्यच आहे.”
27
मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले.
28
त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहुदी मनुष्याने अन्य लोकांबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्यांच्याकडे येAजा करणे हे त्याच्या रीतिरिवाजांविरुद्ध आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये, असे देवाने मला सांगितले आहे.
29
म्हणून मला बोलाविल्याबरोबर मी आढेवेढे न घेता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?”
30
कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या घरी प्रार्थना करत होतो. ही प्रार्थना करीत असताना तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यासमोर उभा राहून मला म्हणाला,
31
‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझ्या दानधर्माचे स्मरण देवासमोर करण्यात आले आहे.
32
तर यापो येथे कोणाला पाठवून पेत्र या नावाने राहणाऱ्या शिमोनाला बोलावून आण, तो समुद्रकिनारी शिमोन चर्मकाराच्या घरी पाहुणा आहे.’
33
म्हणून मी माणसांना आपल्याकडे तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपल्याला निर्देश देऊन सांगितले आहे, ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.”
34
पेत्राने बोलण्यास आरंभ केला:
35
‘देव पक्षपाती नाही, हे आता माझ्या पक्के ध्यानात आले आहे. प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.
36
येशू सर्वांचा प्रभू आहे व त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करताना आपला जो संदेश इस्राएलच्या संततीस पाठवला तो तुम्हांला ठाऊक आहे.
37
योहानने बाप्तिस्मा घोषित केल्यानंतर गालीलपासून प्रारंभ होऊन तो संदेश सर्व यहुदियामध्ये पसरला.
38
नासरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला कारण देव त्याच्याबरोबर होता.
39
त्याने यहुदी लोकांच्या देशात व यरुशलेम नगरात जे काही केले त्या सर्वांचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांनी त्याला क्रुसावर चढवून मारले.
40
परंतु त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याला प्रकट केले.
41
पण ते प्रकटीकरण सर्व लोकांसमोर न करता जे साक्षीदार देवाने पूर्वी निवडले होते त्या आम्हांसमोर केले; तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर आम्ही खाणेपिणे केले.
42
त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, लोकांना घोषणा करुन सांगा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.
43
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्ट्ये त्याच्याविषयी देतात.”
44
पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांमध्ये पवित्र आत्मा उतरला.
45
यहुदीतरांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे, असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या व सुंता झालेल्या श्रद्धावंत लोकांना आश्चर्य वाटले;
46
कारण त्यांनी त्यांना अपरिचित भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले.
47
पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांना पाण्याने बाप्तिस्मा दिला जाऊ नये अशी कोण मनाई करेल?”
48
येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना बाप्तिस्मा दिला जावा, अशी त्याने आज्ञा केली. त्यांनी त्याला विनंती केली की, त्याने काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28