bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Acts 24
Acts 24
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 25 →
1
पाच दिवसांनंतर उच्च याजक हनन्या, काही वडीलजन आणि तिर्तुल्ल नावाचा एक वकील ह्यांना घेऊन तेथे आला. त्यांनी राज्यपालांपुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.
2
त्याला बोलावल्यावर तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो असा - “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हांला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत,
3
म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.
4
तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमची थोडक्यात मांडलेली बाजू ऐकावी.
5
हा माणूस म्हणजे एक पीडा आहे, असे आम्हांला आढळून आले आहे. जगातल्या सर्व यहुदी लोकांत हा बंड करणारा असून नासरेथकर पंथाचा तो पुढारी आहे.
6
ह्याने मंदिरही विटाळविण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्ही धरले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो.
7
पण लुसिया सहस्त्राधिपतीने येऊन, मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून सोडवून नेले
8
आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली. ह्याची आपण चौकशी कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”
9
ह्या गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून यहुदी लोकांनीही दुजोरा दिला.
10
राज्यपालांनी बोलण्यास खुणाविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात, हे मला ठाऊक आहे म्हणून मी माझ्यासंबंधीच्या गोष्टींचे आनंदाने समर्थन करतो.
11
आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेममध्ये उपासना करावयास जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत
12
आणि मंदिरात, सभास्थानात किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकांत बंडाळी माजविताना मी त्यांना आढळलो नव्हतो.
13
ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आत्ता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे सिद्ध करता येत नाहीत,
14
तरीही मी आपणासमोर इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते चुकीचा मार्ग म्हणतात, त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो
15
आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात, तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.
16
ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझी सद्सद्विवेकबुद्धी सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो.
17
मी काही वर्षांनी माझ्या स्वतःच्या लोकांना दानधर्म व त्यांच्यासाठी यज्ञार्पणे करण्यास आलो.
18
हे करत असता मी व्रतस्थ असा मंदिरात होतो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता, पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहुदी होते,
19
माझ्याविरुद्ध काही असते, तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करावयाचा होता.
20
किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता, माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते तरी ह्यांनी सांगावे.
21
ह्यांच्यामध्ये उभे राहून, ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे’, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा माझा अपराध असला तर असो.”
22
परंतु फेलिक्सला प्रभुमार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसिया सहस्त्राधिपती येईल, तेव्हा मी तुमच्या खटल्याविषयी निर्णय देईन.”
23
त्याने शताधिपतीला हुकूम केला, “पौलाला पहाऱ्यात ठेवावे, तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.”
24
काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले.
25
तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी पौल भाषण करत असता फेलिक्सने भयभीत होऊन म्हटले, “सध्या जा. संधी सापडली म्हणजे तुला परत बोलावीन.”
26
शिवाय आपणास पौलाकडून पैसा मिळेल अशी आशाही त्याला होती म्हणून तो त्याला पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे.
27
पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्सच्या जागेवर पुर्क्य फेस्त ह्याची नेमणूक झाली. तेव्हा यहुदी लोकांची मर्जी राखण्यासाठी फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28