bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Acts 28
Acts 28
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
1
असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे, असे आम्हांला समजले.
2
तेथील लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.
3
पौलने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला.
4
तो साप त्याच्या हाताला लटकलेला पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस खुनी आहे, हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देणार नाही.”
5
त्याने तर तो साप विस्तवात झटकून टाकला. पौलाला काही इजा झाली नाही.
6
त्याला सूज येईल अथवा तो एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते, पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही, असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, “हा कोणी देव आहे.”
7
तिकडे त्या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे स्वागत करून आदराने आमचा पाहुणचार तीन दिवस केला.
8
तेव्हा असे झाले की, पुब्ल्यचा बाप तापाने व आंवरक्ताने आजारी पडला होता. त्याच्याकडे जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले.
9
हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे झाले.
10
तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही जहाजाने जायला निघालो तेव्हा आमच्या गरजेच्या वस्तू त्यांनी जहाजावर भरल्या.
11
ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियातील दयस्कुरै (जुळी दैवते) ह्या नावाचे जे तारू हिवाळा घालविण्याकरता त्या बेटाजवळ थांबले होते, त्यात बसून आम्ही निघालो.
12
सुराकूस शहरात पोहोचल्यावर आम्ही तीन दिवस तिथे राहिलो.
13
तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोना ह्या ठिकाणी आलो. दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पुत्युल नगरास पोहचलो.
14
तेथे आम्हांला बंधुजन भेटले, त्यांनी त्यांच्याबरोबर सात दिवस राहावयाचे आम्हांला आमंत्रण दिले, अशा रितीने आम्ही रोम शहराजवळ आलो.
15
तेथले बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची बाजारपेठ व तीन उतारशाळा नावाच्या ठिकाणापर्यंत आम्हांला सामोरे आले, त्यांना पाहून पौलने देवाचे आभार मानले, त्याला बराच धीर आला.
16
आम्ही रोम शहरात गेल्यावर रोमन अधिकाऱ्याने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.
17
तीन दिवसांनंतर पौलाने यहुदी लोकांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, बंधुजनहो, “मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या चालीरीतींविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेममध्ये बंदिवान करून रोमन लोकांच्या हाती देण्यात आले.
18
त्यांनी चौकशी केल्यावर मी मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केला नाही, हे कळल्यावर ते मला सोडू पाहत होते,
19
परंतु यहुदी लोकांनी विरोध केल्यामुळे कैसरजवळ न्याय मागणे मला भाग पडले, तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप ठेवायचा नाही.
20
ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर बोलावे म्हणून तुम्हांला बोलावले. इस्राएली लोकांनी ज्याची आशा बाळगली आहे त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साखळीने बांधलेला आहे.”
21
त्यांनी त्याला म्हटले, “आपल्यासंबंधाने यहुदियातून आम्हांला काही पत्रे आली नाहीत किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणांविषयी काही प्रतिकूल वृत्तांत आणला नाही अथवा काही सांगितलेही नाही.
22
तरी आपले विचार काय आहेत, ते आपणांकडून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.”
23
म्हणून त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या मुक्कामी आले. त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण करत होता.
24
त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर काही लोकांनी विश्वास ठेवला नाही.
25
त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की,
26
ह्या लोकांकडे जाऊन सांग की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला आकलन होणार नाही.
27
कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांचे परिवर्तन होऊ नये आणि मी त्यांना बरे करू नये’.
28
म्हणून तुम्हांला ठाऊक असू द्या की, देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा संदेश यहुदीतरांकडे पाठवला आहे आणि ते तो ऐकतील.”
29
तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले.
30
पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.
31
तो उघडपणे पूर्ण धैर्याने कोणापासून अडथळा न होता देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28