bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Acts 22
Acts 22
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 23 →
1
“बंधुजनहो व वडीलजनांनो, मी आता तुमच्यासमोर माझी बाजू मांडत आहे.”
2
तो आपणाबरोबर हिब्रू भाषेत बोलत आहे, हे ऐकून ते अधिक शांत झाले. तो पुढे म्हणाला,
3
“मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकिया येथील तार्स नगरात झाला आणि मी ह्या यरुशलेम शहरात गमलिएलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे काटेकोर शिक्षण मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
4
पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देऊनसुद्धा मी प्रभुमार्ग अनुसरणाऱ्यांचा छळ केला.
5
त्याविषयी उच्च याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्याकडून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्क ह्या ठिकाणी चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेममध्ये शासन करावयास आणावे.
6
जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा दुपारच्या वेळेस माझ्याभोवती एकाएकी प्रखर प्रकाश आकाशांतून चमकला.
7
मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली.
8
मी विचारले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’
9
माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
10
मी म्हणालो, ‘प्रभो, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्क येथे जा, तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, ते सर्व तुला तेथे सांगण्यात येईल.’
11
त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले म्हणून माझ्या सहकाऱ्यांनी माझा हात धरून मला दिमिष्क येथे नेले.
12
हनन्या नावाचा एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
13
तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणी मी त्याच्याकडे वर पाहिले.
14
तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे, हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान सेवकाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी.
15
कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षीदार होशील.
16
तर आता उशीर का करतोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’
17
मी यरुशलेमला परत आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता मला दृष्टान्त घडला.
18
तेव्हा मी प्रभूला पाहिले, तो मला म्हणाला, ‘त्वरा कर, यरुशलेममधून लवकर निघून जा कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.’
19
मी म्हणालो, ‘प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी तुरुंगात टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करत असे.
20
स्तेफन जेव्हा तुझा रक्तसाक्षी झाला, तेव्हा स्वतः मी जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळीत होतो.’
21
तेव्हा प्रभूने मला सांगितले, ‘जा, मी तुला यहुदीतरांकडे दूर पाठवतो.’”
22
ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले, त्यानंतर ते ओरडून म्हणाले, “ह्याची वाट लावा, ह्याची जगण्याची लायकी नाही!”
23
ते ओेरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता
24
सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते, हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले.
25
परंतु त्यांनी त्याला बांधावयास सुरुवात केली तेव्हा जवळ उभ्या असलेल्या रोमन अधिकाऱ्याला पौलाने विचारले, “ज्या रोमन नागरिकाला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
26
हे ऐकून रोमन अधिकाऱ्याने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमन आहे.”
27
तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”
28
सरदाराने म्हटले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”
29
ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले, शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले, तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बेड्या ठोकल्या होत्या.
30
यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप ठेवला होता, तो काय आहे, हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने पौलाला बेड्यांतून मोकळे केले आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला तेथे आणून त्यांच्यापुढे उभे केले.
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 23 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28