bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Luke 17
Luke 17
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 18 →
1
येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार!
2
त्याने ह्या लहानांतील एकाला पापासाठी प्रवृत्त करावे, ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकावे, ह्यात त्याचे हित आहे.
3
तू स्वतःला सांभाळ. तुझ्या भावाने अपराध केला, तर त्याचा दोष त्याला दाखवून त्याची कानउघाडणी कर आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.
4
त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी तू त्याला क्षमा करायला हवी.”
5
प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”
6
प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीच्या झाडाला ‘तू मुळासकट उपटून समुद्रात लावले जा’, असे तुम्ही सांगताच ते तुमचे ऐकेल.
7
तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘लवकर येऊन जेवायला बस?’
8
किंबहुना ‘माझे जेवण तयार कर. माझे खाणेपिणे होईपर्यंत कमरेभोवती बाह्यवस्त्र बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी’, असे तो त्याला म्हणणार नाही काय?
9
सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे आभार मानतो काय?
10
त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, ‘आम्ही अपात्र नोकर आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे’, असे म्हणा.”
11
येशू यरुशलेमकडे जात असता शोमरोन व गालीलच्या सरहद्दीवरून गेला.
12
तो एका गावात जात असता कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला दूरू न भेटले.
13
ते ओरडून म्हणाले, “अहो येशू, प्रभो, आमच्यावर दया करा.”
14
त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा.” त्यानंतर असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले.
15
त्यांतील एक जण आपण बरे झालो आहोत, असे पाहून उच्च स्वराने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला.
16
येशूचे आभार मानून तो त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता.
17
येशूने म्हटले, “दहा जण शुद्ध झाले होते ना? इतर नऊ जण कुठे आहेत?
18
हा परका एकटाच देवाचा गौरव करायला परत आला, हे कसे काय?”
19
येशूने त्याला म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
20
देवाचे राज्य केव्हा येईल, असे परुश्यांनी त्याला विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य रूपात येत नाही.
21
‘पाहा, ते येथे आहे’ किंवा ‘ते तेथे आहे’ असे म्हणता येत नाही. पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
22
पुढे त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा बाळगाल, पण तो दिवस तुम्हांला दिसणार नाही.
23
काही जण तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, तो येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका.
24
वीज जशी आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल.
25
तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे, हे क्रमप्राप्त आहे.
26
नोहाच्या दिवसांत झाले, तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल.
27
नोहा तारवात गेला आणि जलप्रलय येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न लावून देत होते.
28
तसेच ज्याप्रमाणे लोटच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल, म्हणजे ते लोक खातपीत होते, खरेदी करत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते.
29
परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला.
30
मनुष्याचा पुत्र प्रकट होईल, त्या दिवशी असेच होईल.
31
त्या दिवशी जो छपरावर असेल, त्याने आपले सामान नेण्याकरिता खाली घरात जाऊ नये. तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी घराकडे परत जायला निघू नये.
32
लोटच्या पत्नीची आठवण करा.
33
जो कोणी आपला जीव वाचवायचा प्रयत्न करील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल, तो आपला जीव वाचवील.
34
मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका खाटेवर दोघे असतील. एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल.
35
दोघी मिळून दळत असतील. एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल.
36
[दोन पुरुष शेतात असतील. एक घेतला जाईल, दुसरा तेथेच ठेवला जाईल.]”
37
त्यांनी त्याला म्हटले, “प्रभो, कुठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे मढे तेथे गिधाडे.”
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 18 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24