bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Luke 24
Luke 24
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
1
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस, आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या स्त्रिया कबरीजवळ आल्या,
2
तेव्हा कबरीबरून शिळा बाजूला केलेली आहे, असे त्यांना आढळले.
3
त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.
4
म्हणून त्या गोंधळून गेल्या. तेवढ्यात लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ अकस्मात उभे राहिले.
5
भयभीत होऊन त्या खाली बघत असता, ते पुरुष त्यांना म्हणाले, “तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता?
6
तो येथे नाही, तर तो उठला आहे. तो गालीलात होता तेव्हा त्याने तुम्हांला काय सांगितले होते, ते आठवा.
7
ते असे की, मनुष्याच्या पुत्राला पापी लोकांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला क्रुसावर चढवण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.”
8
तेव्हा त्या स्त्रियांना येशूच्या शब्दांची आठवण झाली.
9
कबरीजवळून त्या परत गेल्या व त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले.
10
त्या स्त्रिया मरिया मग्दालिया, योहान व याकोबची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या, त्यांनीही हे वृत्त प्रेषितांना सांगितले.
11
परंतु हे वृत्त त्यांना वायफळ बडबड वाटली व त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही.
12
मात्र पेत्र उठून कबरीकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या कापडाचे तुकडे दिसले. झालेल्या प्रकाराविषयी आश्चर्यचकित होऊन तो घरी गेला.
13
त्याच दिवशी येशूच्या शिष्यांपैकी दोघे जण यरुशलेमपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला जायला निघाले होते.
14
घडलेल्या सर्व घटनांविषयी ते एकमेकांशी संभाषण करत होते.
15
ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला.
16
त्यांनी त्याला पाहिले परंतु ओळखले नाही.
17
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात, त्या कोणत्या?” ते दुःखी होऊन उभे राहिले.
18
त्यांच्यातील क्लयपा नावाच्या एकाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेममध्ये घडलेल्या घटना ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?”
19
तो त्यांना म्हणाला, “कोणत्या घटना?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या नजरेत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता.
20
त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी देहान्ताच्या शिक्षेसाठी पकडून क्रुसावर चढवले.
21
इस्राएलची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी होऊन आज तीन दिवस झाले.
22
आणखी आमच्यातील ज्या अनेक स्त्रिया भल्या पहाटेस कबरीकडे गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हांला थक्कच केले.
23
त्यांना त्याचे शरीर कबरीत सापडले नाही. त्यांनी येऊन म्हटले, ‘आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.’
24
मग आमच्यापैकी काही जण कबरीकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले. मात्र त्यांना त्याचे शरीर दिसले नाही.”
25
मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही किती निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यात किती मतिमंद आहात!
26
ख्रिस्ताने ही दुःखे सोसावीत आणि आपल्या वैभवात प्रवेश करावा, हे क्रमप्राप्त नव्हते काय?”
27
मग येशूने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण धर्मशास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.
28
ज्या गावास ते जात होते, त्या गावाजवळ ते आले, तेव्हा त्याला जणू पुढे जायचे आहे, असे येशूने दाखवले.
29
परंतु ते त्याला विनंती करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा, संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तो त्यांच्याबरोबर वसती करायला आत गेला.
30
तेथे तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली.
31
तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले आणि तो अंतर्धान पावला.
32
ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व धर्मशास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपली अंतःकरणे आपल्याठायी धगधगत नव्हती काय?”
33
त्याच घटकेस ते उठून यरुशलेम येथे परत गेले. तेथे अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले.
34
ते म्हणत होते की, प्रभू खरोखर उठला आहे व तो शिमोनच्या दृष्टीस पडला आहे.
35
ह्या दोघा शिष्यांनी वाटेतल्या घटना त्यांना सांगितल्या व येशूने भाकर मोडली, तेव्हा आपण प्रभूला कसे ओळखले, हे निवेदन केले.
36
ते दोघे ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.”
37
ते भयभीत झाले. आपण भूत पाहत आहोत, असे त्यांना वाटले.
38
त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरता व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात?
39
माझे हात व माझे पाय पाहा. मी स्वतः तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता, तसे भुताला नसते.”
40
असे बोलून त्याने त्यांना त्याचे हात व पाय दाखवले.
41
तरीही त्यांना विश्वास ठेवणे अवघड वाटत होते. मात्र ते हर्षभराने आश्चर्यचकित झाल्यामुळे येशूने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?”
42
त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला.
43
तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला.
44
नंतर तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत:मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक होते.”
45
त्यांना धर्मशास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन जागृत केले.
46
त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे
47
आणि यरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.
48
तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आहात.
49
पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेले वरदान मी तुमच्याकडे पाठवतो. मात्र तुम्हांला स्वर्गीय सामर्थ्याचे वरदान प्राप्त होईपर्यंत ह्या शहरात राहा.”
50
त्यानंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला.
51
त्यांना आशीर्वाद देत असताना तो त्यांच्यापासून दूरदूर होत वर स्वर्गात घेतला गेला.
52
तेव्हा ते त्याची आराधना करून अतिशय आनंदाने यरुशलेमला परत गेले
53
व मंदिरात देवाला अविरत धन्यवाद देत राहिले.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24