bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Luke 18
Luke 18
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 19 →
1
शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा:
2
‘एका नगरात एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे.
3
त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन आर्जवून विनंती करत असे, ‘माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.’
4
काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही,
5
तरी ही विधवा मला भंडावून सोडते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन माझा जीव खाईल.’”
6
प्रभूने म्हटले, “दुष्ट न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका.
7
तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?
8
मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तथापि मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
9
आपण नीतिमान आहोत, असा स्वतःविषयी भरवसा बाळगून जे कित्येक जण इतर सर्वांना तुच्छ मानत होते; त्यांनाही त्याने एक दाखला सांगितला. तो असा:
10
‘एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करायला मंदिरात गेले.
11
परुश्याने एकटे निराळे उभे राहून मनातल्या मनात अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लोभी, अप्रामाणिक आणि व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.
12
मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश दान देतो.’
13
जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावायलादेखील न धजता आपला ऊर बडवीत प्रार्थना करत होता, ‘हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.’
14
मी तुम्हांला सांगतो, त्या परुशी माणसापेक्षा हा जकातदार नीतिमान ठरून आपल्या घरी परतला. स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्याला लीन केले जाईल आणि स्वतःला लीन करणाऱ्याला उंच केले जाईल.”
15
येशूने स्पर्श करावा म्हणून काही लोकांनी त्यांची तान्ही बाळेदेखील त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यांना दटावू लागले.
16
तेव्हा येशूने बालकांना स्वतःजवळ बोलावून म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका. देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
17
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात मुळीच प्रवेश होणार नाही.”
18
एका यहुदी अधिकाऱ्याने येशूला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! मी काय केल्याने मला शाश्वत जीवन वतन म्हणून मिळेल?”
19
येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी चांगला नाही.
20
तुला आज्ञा ठाऊक आहेत:व्यभिचार करू नकोस; खून करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान कर.”
21
तो म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.”
22
हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझे अनुकरण कर.”
23
पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला कारण तो फार श्रीमंत होता.
24
त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धनसंपत्ती आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!
25
श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”
26
ज्यांनी हे ऐकले त्यांनी विचारले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
27
त्याने उत्तर दिले, “जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.”
28
पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आमचे घरदार सोडून तुला अनुसरलो आहोत.”
29
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत,
30
त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात शाश्वत जीवन मिळेल.”
31
त्याने बारा शिष्यांना बाजूला घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण यरुशलेम येथे चाललो आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत.
32
त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल. त्याची कुचेष्टा व विटंबना होईल. त्याच्यावर थुंकतील.
33
त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल.”
34
शिष्यांना मात्र ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही. खरे म्हणजे हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते म्हणून सांगितलेल्या गोष्टी त्यांना समजल्या नव्हत्या.
35
येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता.
36
त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय चालले आहे?”
37
त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.”
38
तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”
39
त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरीही तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”
40
तेव्हा येशूने उभे राहून त्याला स्वतःकडे आणण्याचा आदेश दिला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले,
41
“मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी मिळावी.”
42
येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी मिळो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
43
तत्क्षणी त्याला दृष्टी मिळाली आणि तो देवाचा महिमा वर्णन करीत त्याच्यामागे चालू लागला. हे पाहून सर्व लोकांनी देवाचे स्तवन केले.
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24