bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Luke 20
Luke 20
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 21 →
1
एके दिवशी येशू मंदिरात शिकवण देत व शुभवर्तमान सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलजनांसह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले,
2
“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण, हे आम्हांला सांगा.”
3
त्याने त्यांना उत्तर दिले, “मीदेखील तुम्हांला एक प्रश्न विचारतो. त्याचे मला उत्तर द्या.
4
योहानचा बाप्तिस्मा स्वर्गीय होता किंवा मानवी होता?”
5
ते आपसात विचार करून म्हणाले, “स्वर्गीय असे म्हणावे तर हा म्हणेल, “तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
6
आणि मानवी असे म्हणावे तर सर्व लोक आपल्यावर धोंडमार करतील कारण योहान संदेष्टा होता, अशी त्यांची खातरी पटलेली आहे.”
7
म्हणून त्यांनी उत्तर दिले, “तो कोणत्या प्रकारचा होता, हे आम्हांला ठाऊक नाही.”
8
नंतर येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो, हे मीसुद्धा तुम्हांला सांगणार नाही.”
9
येशू लोकांना एक दाखला सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि तो कुळांकडे सोपवून देऊन स्वतः बरेच दिवस परदेशी निघून गेला.
10
कुळांनी त्याला द्राक्षमळ्यातील त्याच्या हिश्शाची फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले. परंतु कुळांनी त्याला मारहाण करून रिकामे पाठवून दिले.
11
पुन्हा त्याने दुसऱ्या एका दासाला पाठवले. त्यालादेखील त्यांनी मारहाण करून व त्याचा अपमान करून काही न देता पाठवून दिले.
12
त्याने तिसऱ्याला पाठवले. त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर हाकलून लावले.
13
शेवटी द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘आता मी काय करू? मी माझ्या प्रिय पुत्राला पाठवतो. निदान ते त्याचा मान राखतील’,
14
परंतु कुळे त्याला पाहून आपसात विचार करून म्हणाली, ‘हा तर वारस आहे, ह्याला आपण ठार मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’
15
त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील?”, येशूने विचारले.
16
“तो येऊन त्या कुळांचा नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांकडे सोपवून देईल”, येशूनेच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर दिले. हे ऐकून लोक म्हणाले, “असे न होवो.”
17
येशूने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर मग ‘जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे’, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, त्याचा अर्थ काय?
18
जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगा भुगा करून टाकील.”
19
शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकायच्या विचारात होते, कारण हा दाखला त्याने त्यांना उद्देशून सांगितला, हे ते समजले. पण त्यांना लोकांची भीती वाटली.
20
म्हणून ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात पकडून रोमन राज्यपालांच्या अधिकाराखाली व सत्तेखाली आणावे म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाचे ढोंग केलेले हेर त्याच्याकडे पाठवले.
21
त्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या बोलण्यात व शिकवणीत आपण पक्षपात करीत नसता. किंबहुना आपण देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता, हे आम्हांला माहीत आहे.
22
आम्ही कैसरला कर द्यावा, हे योग्य आहे की नाही?”
23
तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा.
24
ह्याच्यावरील मुद्रा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसरचा.”
25
त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.”
26
त्यांना त्याला लोकांसमक्ष त्याच्या बोलण्यात धरता येईना. त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.
27
पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन येशूला विचारले,
28
‘गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ त्याची पत्नी जिवंत असता निःसंतान निधन पावला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा.
29
एके ठिकाणी सात भाऊ राहत होते, त्यांच्यातील पहिल्या भावाने लग्न केले व तो निःसंतान मरण पावला.
30
मग दुसऱ्याने तिच्याबरोबर विवाह केला व तिसऱ्यानेदेखील.
31
ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे निधन पावले.
32
शेवटी ती स्त्रीदेखील देवाघरी गेली.
33
तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल; ती तर त्या सातांचीही पत्नी झाली होती.”
34
येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न लावून देतात.
35
परंतु त्या युगासाठी व मेलेल्यांतून पुनरुत्थान प्राप्त करून घेण्यासाठी जे योग्य ठरतील, ते लग्न करणार नाहीत व लग्न लावून देणार नाहीत.
36
खरे म्हणजे ते पुढे मरू शकत नाहीत कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.
37
मोशेनेदेखील झुडुपांच्या गोष्टीत प्रभूला अब्राहामचा परमेश्वर, इसहाकचा परमेश्वर याकोबचा परमेश्वर असे म्हणून मेलेले उठवले जातात, हे दर्शविले आहे.
38
तो मृतांचा नव्हे, तर जिवंतांचा परमेश्वर आहे कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.”
39
हे ऐकून शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरुजी, आपण ठीक बोललात.”
40
त्यानंतर ते त्याला आणखी काहीही विचारायला धजले नाहीत.
41
त्यानंतर येशूने त्यांना विचारले, “लोक ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे कसे म्हणतात?
42
कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो: प्रभूने माझ्या प्रभूला सांगितले,
43
‘मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’
44
दावीद अशा प्रकारे त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?”
45
सर्व लोक ऐकत असता त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले,
46
“शास्त्री लोकांविषयी सावध असा, त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायची हौस असते. बाजारात नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवानीत सन्मानाच्या जागा त्यांना आवडतात.
47
ते विधवांची घरे गिळंकृत करतात. लोकांना दाखवण्याच्या उद्देशाने लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना अधिक शिक्षा होईल.”
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 21 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24