bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Mark 1
Mark 1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
1
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ:
2
यशया संदेष्ट्याने लिहिले आहे, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवीन. तो तुझा मार्ग तयार करील.
3
अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’
4
त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत बाप्तिस्मा देणारा योहान अरण्यात आला.
5
यहुदिया प्रांतातील व यरुशलेम नगरातील कित्येक लोक त्याच्याकडे गेले आणि त्यांनी स्वतःची पापे कबूल करून योहानकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
6
योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे व त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे. टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते.
7
तो घोषणा करत म्हणे, “माझ्यापेक्षा अधिक समर्थ असा एक माझ्यामागून येत आहे. लवून त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.
8
मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.”
9
त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलमधील नासरेथहून आला आणि योहानच्या हातून यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाला.
10
लगेच, पाण्यातून वर येत असताना, त्याला दिसले की, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा स्वतःवर उतरत आहे.
11
आणि त्या वेळी आकाशातून वाणी झाली, “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”
12
आत्म्याने येशूला लगेच अरण्यात नेले.
13
तेथे सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो त्या ठिकाणी चाळीस दिवस राहिला. तेथे वनपशूदेखील होते. मात्र देवदूत त्याची सेवा करत होते.
14
योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला,
15
“काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.”
16
एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते.
17
येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”
18
ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले.
19
तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचे मुलगे याकोब व योहान दिसले. ते त्यांच्या तारवात जाळी नीट करीत होते.
20
त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.
21
येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले.
22
त्याच्या प्रबोधनावरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत असे.
23
त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात एक भूतग्रस्त मनुष्य आला
24
आणि ओरडून म्हणाला, “हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस.”
25
येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.”
26
भुताने त्या माणसाला पिळून काढले व आक्रोश करीत ते त्याच्यातून निघून गेले.
27
सर्व लोक इतके थक्क झाले की, ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? ही काय नवीन शिकवण आहे? हा भुतांनाही अधिकाराने आज्ञा करतो व ती त्याचे ऐकतात.”
28
ही त्याची कीर्ती गालीलच्या परिसरात सर्वत्र वेगाने पसरली.
29
सभास्थानातून निघाल्यावर लगेच येशू आणि त्याचे शिष्य, याकोब व योहान ह्यांना घेऊन शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले.
30
शिमोनची सासू तापाने खाटेवर पडली होती. तिच्याविषयी त्यांनी येशूला ताबडतोब सांगितले.
31
तो तिच्याजवळ गेला व त्याने तिला हात धरून उठवले. तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
32
संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी व भूतग्रस्त लोकांना त्याच्याकडे आणले.
33
सगळे नगर दाराशी लोटले.
34
नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूतग्रस्तांना मुक्त केले. त्या भुतांनी येशूला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही.
35
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस उठून येशू नगराबाहेर एकांतात गेला व तेथे तो प्रार्थना करू लागला.
36
परंतु शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध घेऊ लागले.
37
तो भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध घेत आहेत.”
38
परंतु तो त्यांना म्हणाला, “आपण आसपासच्या गावांत जायला हवे. मला तेथेही प्रबोधन केले पाहिजे कारण ह्याच उद्देशाने मी आलो आहे.”
39
म्हणूनच त्यांच्या सभास्थानांत प्रबोधन करत व भुते काढत तो सबंध गालीलमध्ये फिरला.
40
एकदा एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली, तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.”
41
येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो.”
42
लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला.
43
येशूने त्याला बजावून सांगितल्यानंतर लगेच पाठवून दिले.
44
तो त्याला म्हणाला, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस पण जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि तू बरा झाला आहेस ह्याचा लोकांना पुरावा म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”
45
परंतु त्याने तेथून जाताना ती गोष्ट इतकी पसरवली आणि तिला प्रसिद्धी दिली की, येशूला उघडपणे कोणत्याही नगरात जाता येईना, म्हणून तो बाहेर रानात एकांत ठिकाणीच राहिला आणि लोक सगळीकडून त्याच्याकडे येत राहिले.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16