bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Mark 4
Mark 4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
1
येशू पुन्हा गालील सरोवराच्या किनाऱ्यावर प्रबोधन करू लागला. त्याच्याजवळ इतका विशाल समुदाय जमला की, तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक सरोवराच्या काठी जमिनीवर होते.
2
तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला,
3
“ऐका, एक पेरणारा पेरणी करायला निघाला.
4
तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले. ते पक्ष्यांनी खाऊन टाकले.
5
काही बी खडकाळ जमिनीत पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते बी लवकर उगवले.
6
सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले. मुळे खोल गेलेली नसल्यामुळे ते वाळून गेले.
7
काही बी काटेरी झुडपांत पडले. काटेरी झुडपे वाढल्यामुळे त्याची वाढ खुंटली म्हणून त्याला पीक आले नाही.
8
परंतु काही बी चांगल्या जमिनीत पडले. ते उगवले. मोठे झाले व त्याला पीक आले. काहींना तीसपट, काहींना साठपट, तर काहींना शंभरपट असे पीक आले.”
9
पुढे येशू म्हणाला, “ज्यांना ऐकण्यासाठी कान असतील त्यांनी ऐकावे!”
10
येशू एकान्ती असता त्याचे प्रबोधन ज्यांनी ऐकले होते, त्यांपैकी काहींनी बारा जणांसह त्याच्याकडे येऊन त्याला ह्या दाखल्याविषयी विचारले.
11
त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच्या राज्याचे रहस्य तुम्हांला समजावून दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते.
12
अशासाठी की, त्यांनी पाहावे पण त्यांना आकलन होऊ नये; ऐकून घ्यावे पण त्यांना समजू नये; म्हणजे त्यांनी देवाकडे पुन्हा वळू नये व त्यांना क्षमा मिळू नये.”
13
त्याने त्यांना पुढे विचारले, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग इतर दाखले तुम्हांला कसे समजतील?
14
पेरणारा वचन पेरतो.
15
काही लोक वाटेवर पडलेल्या वचनासारखे आहेत. त्यांनी वचन ऐकल्याबरोबर सैतान येतो व त्यांच्यात पेरलेले वचन हिरावून घेतो.
16
इतर काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात.
17
पण त्यांचे मूळ खोलवर न गेल्यामुळे ते अल्पकाळ टिकाव धरतात. त्या वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते तत्क्षणी वचन सोडून देतात.
18
इतर काही लोक काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखे आहेत. ते वचन ऐकून घेतात.
19
परंतु प्रपंचाची चिंता, पैशाचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.
20
आणखी काही लोक चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकून ते स्वीकारतात आणि कोणी तीसपट, कोणी साठपट, तर कोणी शंभरपट असे पीक देतात.”
21
आणखी त्याने त्यांना विचारले, “दिवा मापाखाली किंवा खाटेखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना?
22
जे गुप्त ठेवण्यात आले आहे, ते प्रकट केले जाईल; जे झाकून ठेवण्यात आले आहे, ते उघड केले जाईल.
23
ज्याला ऐकण्यासाठी कान असतील, त्याने ऐकावे!”
24
पुढे तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता, त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या मापाने द्याल त्या मापाने तुम्हांला दिले जाईल आणि त्याहीपेक्षा अधिक दिले जाईल;
25
कारण ज्याच्याकडे आहे, त्याला दिले जाईल व ज्याच्याकडे नाही, त्याचे असेल नसेल तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल.”
26
आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी पेरतो,
27
रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही.
28
जमीन आपोआप पीक देते - प्रथम अंकुर, मग कणीस, नंतर कणसात भरलेला दाणा.
29
पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा चालवतो, कारण कापणीची वेळ आलेली असते.”
30
येशूने विचारले, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी? अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?
31
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला,
32
तरी पेरल्यावर उगवून सर्व रोपट्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की, आकाशातील पक्ष्यांना त्याच्या सावलीत वसती करता येते.”
33
असे पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे.
34
दाखल्याशिवाय तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तरी पण एकान्ती तो त्याच्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.
35
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ या.”
36
शिष्यांनी लोकसमुदायाचा निरोप घेतला व ज्या मचव्यात येशू बसला होता, तेथे जाऊन ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते.
37
अचानक तेथे मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळू लागल्या की, तो पाण्याने भरू लागला.
38
मात्र येशू मचव्याच्या मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून झोपला होता. ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काळजी वाटत नाही काय?”
39
त्याने उठून उभे राहून वाऱ्याला हुकूम सोडला, “निवांत हो!” आणि लाटांना म्हटले, “शांत व्हा!” वारा पडला व अगदी निवांत झाले.
40
त्यानंतर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्ही अजून विश्वास ठेवत नाही काय?”
41
ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील ह्याचे ऐकतात.”
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16