bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
Mark 8
Mark 8
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 9 →
1
काही दिवसांनी पुन्हा एकदा लोकांचा विशाल समुदाय जमला होता व लोकांजवळ खायला काही नव्हते म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले,
2
“मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व आता त्यांच्याजवळ खायला काही नाही.
3
मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेत मूर्च्छित होतील. त्यांतील कित्येक तर दुरून आलेले आहेत.”
4
त्याच्या शिष्यांनी विचारले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणणार?”
5
त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.”
6
त्याने लोकांना जमिनीवर बसायला सांगितले, त्या सात भाकरी घेतल्या व आभार मानून त्या मोडल्या व वाढण्याकरता त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. त्यांनी लोकांना त्या वाढल्या.
7
त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. येशूने त्यांच्यावर आशीर्वाद देउन शिष्यांना तेही वाढायला दिले.
8
सर्व जण जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या भरून घेतल्या.
9
तेथे सुमारे चार हजार लोक होते. त्यानंतर येशूने लोकांना निरोप दिला
10
आणि लगेच तो त्याच्या शिष्यांबरोबर मचव्यात बसून दल्मनुथाच्या भागात गेला.
11
एकदा काही परुशी येऊन येशूबरोबर वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले.
12
अंतर्यामी व्यथित होऊन तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, ह्या पिढीला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.”
13
तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे जायला निघाला.
14
शिष्य भाकरी घ्यायला विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एका भाकरीशिवाय काही नव्हते.
15
येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परुश्यांचे खमीर व हेरोदचे खमीर ह्यांच्यापासून जपून राहा.”
16
तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो हे सांगत आहे, अशी ते आपसात चर्चा करू लागले.
17
हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याची चर्चा का करता? अजून तुमच्या ध्यानात कसे येत नाही आणि अजून तुम्हांला कसे समजत नाही? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?
18
डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय?
19
मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.”
20
“तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते म्हणाले, “सात.”
21
तेव्हा त्याने विचारले, “अजून तुम्हांला समजत नाही काय?”
22
येशू व त्याचे शिष्य बेथसैदा येथे आले. तेथे लोकांनी एका आंधळ्याला त्याच्याकडे आणले व त्याने त्याला स्पर्श करावा, अशी विनंती केली.
23
त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकी लावून त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?”
24
तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत, असे वाटते, परंतु ती मला चालत असलेल्या झाडांसारखी दिसत आहेत”,
25
त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले. त्या माणसाने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले.
26
त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने ताकीद दिली, “ह्या गावात पुन्हा पाऊलसुद्धा टाकू नकोस.”
27
येशू व त्याचे शिष्य फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील खेड्यापाड्यांत जायला निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे, असे लोक म्हणतात?”
28
त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, आणखी काही लोक संदेष्ट्यांपैकी एक, असे म्हणतात.”
29
तेव्हा त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.”
30
तेव्हा “माझ्याविषयी कोणाला सांगू नका”, अशी त्याने त्यांना ताकीद दिली.
31
नंतर येशू त्याच्या शिष्यांना अशी शिकवण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावीत, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.
32
येशूने उघडपणे हे सर्व सांगितले आणि पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याची निर्भर्त्सना करू लागला.
33
त्याने वळून त्याच्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला खडसावले, “अरे सैताना, बाजूला हो!, तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”
34
त्याने त्याच्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे. स्वतःचा क्रूस उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
35
कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
36
कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ?
37
किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?
38
ह्या विश्वासहीन व दुष्ट पिढीत ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो पवित्र देवदूतांसह त्याच्या पित्याच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल.”
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16