bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Kings 10
1 Kings 10
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 11 →
1
परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहायला आली.
2
ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली.
3
शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती.
4
शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर,
5
त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली.
6
ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची जी कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे.
7
तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टींचा मला विश्वास येईना; आता पाहते तर माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तिच्याहून ती अधिक आहेत.
8
आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत.
9
ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”
10
तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.
11
हीरामाची जहाजे ओफीर येथून सोने आणत त्याचप्रमाणे रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही विपुल आणत.
12
राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला कठडे केले; त्याचप्रमाणे गाणार्यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनवल्या; असले रक्तचंदनाचे लाकूड आजवर आले नाही की दृष्टीस पडले नाही.
13
शलमोनाने राजाला अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरवली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली.
14
प्रतिवर्षी शलमोनाकडे सोने येई ते सहाशे सहासष्ट किक्कार भरे;
15
ह्याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार ह्यांच्याकडून सोने येई ते निराळेच.
16
शलमोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली बनवल्या, एकेका ढालीस सहाशे शेकेल सोने लागले.
17
तसेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून तीनशे लहान ढाली केल्या; प्रत्येक लहान ढालीस तीन माने (शेर) सोने लागले; राजाने ह्या ढाली लबानोन येथील वनगृहात ठेवल्या.
18
राजाने एक मोठे हस्तीदंती सिंहासन बनवले, व ते उत्तम सोन्याने मढवले.
19
सिंहासनाला सहा पायर्या होत्या; आसनाचे ओठंगण वरून गोलाकार होते; सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या दोन हातांच्या बाजूंना दोन सिंह केले होते.
20
त्या सहा पायर्यांच्या दोन्ही बाजूंना एकेक असे एकंदर बारा सिंह केले होते; दुसर्या कोणत्याही राज्यात ह्यासारखे केलेले सिंहासन नव्हते.
21
शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; चांदीचे एकही नव्हते; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नव्हते.
22
समुद्रावर हीरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत.
23
शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता.
24
देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेवले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे लोक त्याच्या दर्शनाला येत.
25
येणारा प्रत्येक जण चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणत असे.
26
शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्याजवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले.
27
राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्यांप्रमाणे व गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले.
28
शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्याची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत;
29
एकेका रथाला सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्याला दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणत; हित्ती व अरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणत.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22