bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Kings 5
1 Kings 5
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 6 →
1
काही दिवसांनी सोरचा राजा हीराम ह्याने आपले सेवक शलमोनाकडे पाठवले; शलमोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते; हीराम व दावीद ह्यांची अखंड मैत्री होती.
2
शलमोनाने हीरामास सांगून पाठवले की,
3
“माझे वडील दावीद ह्यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधता आले नाही हे आपल्याला ठाऊक आहे.
4
पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही.
5
पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधण्याचे योजले आहे; परमेश्वराने माझे वडील दावीद ह्यांना म्हटले होते की, “तुझ्या जागी तुझ्या गादीवर तुझा जो पुत्र मी बसवीन तोच माझ्या नामासाठी मंदिर बांधील.” त्याप्रमाणे मी करणार आहे.
6
तर आता माझ्यासाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा द्या; माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील; जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांना देईन; आपल्याला हे ठाऊक आहे की इमारतीसाठी लाकडे कापायचे कसब सीदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही.”
7
शलमोनाचा हा निरोप ऐकून हीरामास फार आनंद झाला व तो म्हणाला, “ह्या थोर राष्ट्रावर राज्य करण्यासाठी दाविदाला असा शहाणा पुत्र ज्याने दिला आहे त्या परमेश्वराचा आज मी धन्यवाद करतो.”
8
हीरामाने शलमोनाला सांगून पाठवले की, “आपण पाठवलेला निरोप मी ऐकला; गंधसरूच्या व देवदारूच्या लाकडांविषयी जे आपले सांगणे आहे त्याप्रमाणे मी करतो.
9
माझे चाकर ती लाकडे लबानोनाहून समुद्रापर्यंत नेतील; तेथे त्याचे तराफे करून जे ठिकाण आपण मला नेमून द्याल तेथे जलमार्गाने ती मी पोचती करीन; तेथे ती मी सोडवून ठेवीन; मग तेथून ती आपण घेऊन जा; माझ्या घरच्या सेवकांना अन्नसामग्री पुरवली म्हणजे पुरे.”
10
शलमोनाला लागली तेवढी गंधसरूची व देवदारूची लाकडे हीरामाने पुरवली.
11
शलमोनाने हीरामाच्या घरच्या सेवकांना निर्वाहासाठी वीस हजार कोर गहू आणि वीस मापे निर्भेळ तेल पुरवले; हा एवढा पुरवठा प्रतिवर्षी शलमोन हीरामास करीत असे.
12
परमेश्वराने आपल्या वचनानुसार शलमोनाला शहाणपण दिले; हीराम व शलमोन ह्यांच्यामध्ये सख्य राहिले आणि त्या दोघांनी करारमदार केले.
13
शलमोन राजाने सर्व इस्राएलातल्या लोकांवर बिगार बसवली, ही बिगार तीस हजार मनुष्यांची होती.
14
लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने दहा-दहा हजार बिगारी त्याने पाठवले; एक महिना ते लबानोन पर्वतावर राहत व दोन महिने घरी राहत; अदोनीराम हा बिगार्यांवर होता.
15
शलमोनाचे सत्तर हजार ओझेकरी आणि पहाडांवर ऐंशी हजार पाथरवट होते.
16
शलमोनाच्या कामावरील मुख्य अंमलदारांखेरीज आणखी तीन हजार तीनशे अंमलदार कामकरी लोकांचा बंदोबस्त करण्यास नेमले होते.
17
मंदिराचा पाया घडीव चिर्यांचा घालावा म्हणून राजाज्ञेने मोठमोठे मोलवान पाषाण खोदून काढण्यात आले.
18
शलमोनाचे व हीरामाचे कारागीर आणि गिबली लोक ह्यांनी ते घडवले; मंदिर बांधण्यासाठी लाकडे व चिरे त्यांनी तयार केले.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22