bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Kings 12
1 Kings 12
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 13 →
1
रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते.
2
नबाटाचा पुत्र यराबाम हा शलमोन राजासमोरून पळून जाऊन मिसर देशात राहिला होता, तेथे त्याने हे ऐकले;
3
आणि लोकांनी त्याला बोलावून आणले; तेव्हा यराबाम व इस्राएलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली,
4
“आपल्या बापाने आमच्यावर जू ठेवले होते ते भारी होते; तर आता आपल्या बापाने आमच्यावर लादलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ.”
5
त्याने त्यांना सांगितले, “आता जा, आणि तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” हे ऐकून ते गेले.
6
रहबाम राजाने आपला बाप शलमोन जिवंत असताना जी वृद्ध माणसे त्याच्या पदरी होती त्यांचा सल्ला घेतला; तो म्हणाला, “ह्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता?”
7
ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.”
8
ह्या वृद्ध माणसांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले जे तरुण त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला.
9
त्याने त्यांना विचारले, “आपल्या बापाने जे जू आमच्यावर ठेवले आहे ते हलके करा, असे म्हणणार्या ह्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत मला काय सल्ला देता?”
10
त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्याला उत्तर दिले, “हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या पित्याने आमच्यावर भारी जू लादले होते तर आता आपण ते हलके करा, त्यांना असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे.
11
माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले ते मी आणखी भारी करणार; माझा बाप तुम्हांला आसुडांनी ताडन करत असे, तर मी तुम्हांला विंचवांनी ताडन करीन.”
12
“तिसर्या दिवशी माझ्याकडे यावे” असे राजाने सांगितले होते, त्याप्रमाणे तिसर्या दिवशी यराबाम व सगळे लोक रहबामाकडे आले.
13
तेव्हा राजाने लोकांना कठोरपणाने जबाब दिला आणि वृद्ध मनुष्यांनी दिलेला सल्ला टाकून,
14
त्या तरुणांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यांना म्हणाला, “माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले होते, पण मी ते अधिक भारी करणार; माझा बाप, तुम्हांला आसुडांनी ताडन करीत असे, मी तर तुम्हाला विंचवांनी ताडन करीन.”
15
ह्या प्रकारे राजाने लोकांचे ऐकले नाही; ह्याचे कारण हेच की जे वचन परमेश्वराने शिलोकर अहीया ह्याच्या द्वारे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याला दिले होते ते पूर्ण व्हावे अशी परमेश्वराची योजना होती.
16
राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही; हे इस्राएला, आपल्या डेर्याकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग इस्राएल लोक आपल्या डेर्यांत चालते झाले.
17
जे इस्राएल लोक यहूदाच्या नगरात वस्ती करून राहिले होते त्यांच्यावर मात्र रहबामाने राज्य केले.
18
रहबाम राजाने वेठीस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा अदोराम ह्याला पाठवले; त्याला सर्व इस्राएल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेला पळून गेला.
19
ह्या प्रकारे इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली ती आजवर चालू आहे.
20
यराबाम परत आला हे सर्व इस्राएलांनी ऐकले तेव्हा त्यांनी त्याला बोलावणे पाठवून सभेस बोलावले व सर्व इस्राएलावर राजा केले; यहूदाच्या वंशाखेरीज दाविदाच्या घराण्याला कोणी धरून राहिला नाही.
21
यरुशलेमेस आल्यावर रहबामाने यहूदाचे सर्व घराणे व बन्यामिनाचा वंश ह्यांतून एकंदर एक लाख ऐंशी हजार निवडक योद्धे जमा केले; इस्राएल घराण्याशी लढाई करून शलमोनाचा पुत्र रहबाम ह्याच्या हाती राज्य परत यावे असा हेतू होता.
22
तेव्हा परमेश्वराचे वचन देवाचा माणूस शमाया ह्याला असे आले की,
23
“यहूदाचा राजा शलमोनपुत्र रहबाम, यहूदा व बन्यामीन ह्यांचे सगळे घराणे ह्यांना व इतर सर्व लोकांना असे सांग,
24
परमेश्वर म्हणतो, आपले बांधव इस्राएल ह्यांच्यावर स्वारी करून लढू नका; तुम्ही सर्व आपापल्या घरी परत जा; कारण ही माझी करणी आहे.” त्यांनी परमेश्वराचे हे वचन ऐकले व त्याप्रमाणे ते सगळे परत चालते झाले.
25
यराबाम एफ्राइमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबुती केली.
26
यराबाम आपल्या मनात म्हणाला की, “हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे.
27
लोक यरुशलेमेत यज्ञ करायला गेले तर त्यांचा स्वामी यहूदाचा राजा रहबाम ह्याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जिवे मारून यहूदाचा राजा रहबाम ह्याचे पुन्हा होतील.”
28
राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन दोन सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, “आजवर तुमचे यरुशलेमेस जाणे झाले तेवढे पुरे; हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पाहा.”
29
त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसर्याची दान येथे स्थापना केली.
30
ही गोष्ट पापाला कारण झाली; दानापर्यंतचे लोक ह्यांपैकी एका वासराच्या दर्शनाला जाऊ लागले.
31
त्याने उच्च स्थानी मंदिरे बांधली, आणि सर्व लोकांतून याजक नेमले; ते लेवीचे वंशज नव्हते.
32
मग यराबामाने आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यहूदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होमबली अर्पण केले; त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासरांप्रीत्यर्थ यज्ञ केले, आणि आपण केलेल्या उच्च स्थानांच्या याजकांना बेथेल येथे ठेवले.
33
जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती तिच्यावर स्वतःच्याच मनाने ठरवलेल्या आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने होमबली अर्पण केले; त्याने इस्राएल लोकांसाठी हा सण स्थापला आणि वेदीवर यज्ञबली हवन करून अर्पण केला.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22