bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Kings 4
1 Kings 4
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 5 →
1
शलमोन राजा सर्व इस्राएलाचा राजा होता.
2
त्याचे सरदार हे होते: सादोकाचा पुत्र अजर्या याजक,
3
शिशाचे पुत्र अलिहोरेफ व अहीया हे चिटणीस, अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस (इतिहासलेखक);
4
यहोयादाचा पुत्र बनाया सैन्यावर होता; सादोक व अब्याथार हे याजक होते.
5
नाथानाचा पुत्र अजर्या कमावीसदारांवर (कारभारी) होता; नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता;
6
अहीशार हा खानगी कारभारी (घरकारभारी) होता; व अब्दाचा पुत्र अदोनीराम बिगार्यांवर होता.
7
शलमोनाचे बारा कमावीसदार असत; ते सर्व इस्राएलावर नेमलेले असून राजाला व त्याच्या घराण्याला अन्नसामग्री पुरवत; वर्षातून एकेका महिन्याचा पुरवठा करण्याचे काम एकेकाकडे असे.
8
त्यांची नावे ही: एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशात बेन-हूर;
9
माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन-बेथ-हानान ह्यांत बेन-देकर;
10
अरुबोथात बेन हेसेद (ह्याच्याकडे सोखो व हेफेर प्रदेश होते);
11
दोरच्या सर्व पठारात बेन-अबीनादाब (शलमोनाची कन्या टाफाथ ही त्याची स्त्री होती);
12
तानख, मगिद्दो आणि बेथ-शानचा अवघा प्रदेश म्हणजे सारतानाजवळील इज्रेलाखालचा बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजू-पर्यंत असलेला प्रदेश ह्यांत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता;
13
रामोथ-गिलादात बेन-गेबेर होता (ह्याच्याकडे मनश्शेचा पुत्र याईर ह्याची गिलादातली गावे होती; ह्याशिवाय आणखी बाशानातला अर्गोब प्रांत ह्यातली तटबंदी व पितळेचे अडसर असलेली साठ मोठी नगरे त्याच्याकडे होती);
14
इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाइमात होता;
15
नफतालीत अहीमास हा होता (त्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी विवाह केला होता);
16
आशेर व आलोथ ह्यांत हूशयाचा पुत्र बाना हा होता;
17
इस्साखारात पारूहाचा पुत्र यहोशाफाट हा होता;
18
बन्यामिनात एलाचा पुत्र शिमी हा होता;
19
ऊरीचा पुत्र गेबेर हा गिलादात होता; ह्या एवढ्या देशात तो एकटाच कमावीसदार होता. हा देश पूर्वी अमोर्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग ह्यांचा होता.
20
यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.
21
महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले.
22
शलमोनाला एका दिवसाची भोजनसामग्री लागे, ती येणेप्रमाणे: तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ;
23
दहा पुष्ट बैल, कुरणातले वीस बैल, शंभर मेंढरे, ह्याखेरीज हरिणे, सांबरे, भेकरे व आणखी पुष्ट पक्षी.
24
महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे.
25
दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते.
26
रथांच्या घोड्यांची चाळीस हजार ठाणी व बारा हजार स्वार शलमोन बाळगून होता.
27
शलमोन राजाला व त्याच्या पंक्तीला भोजन करणार्यांसाठी कमावीसदार त्यांच्या-त्यांच्या नेमलेल्या महिन्यांत अन्नाचा पुरवठा करीत; कोणत्याही पदार्थाची वाण ते पडू देत नसत.
28
रथांच्या व स्वारीच्या घोड्यांसाठी जव व पेंढा लागे तो प्रत्येक कमावीसदार नियमाप्रमाणे पोचता करीत असे.
29
देवाने शलमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले.
30
शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.
31
तो सर्व मनुष्यांहून, एज्राही एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कल्कोल व दर्दा ह्या सर्वांहून शहाणा होता, आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.
32
त्याने तीन हजार नीतिसूत्रे कथन केली व एक हजार पाच गीते रचली.
33
त्याने लबानोनावरील देवदारूपासून ते भिंतीतून उगवणार्या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिज्जांचे विवेचन केले; तसेच पशू, पक्षी, रांगणारे जंतू व मासे ह्यांचेही त्याने विवेचन केले.
34
पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकायला येत असत.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22