bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Kings 1
2 Kings 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 2 →
1
अहाबाच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएलावर उलटला.
2
अहज्या हा शोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला; त्याने जासुदांना अशी आज्ञा केली की, “तुम्ही जाऊन एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्न करा की मी ह्या दुखण्यातून बरा होईन काय?”
3
इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलीया तिश्बी ह्याला म्हणाला, “ऊठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदांना जाऊन गाठ आणि विचार, ‘तुम्ही एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्न करायला चालला आहात, ते इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय?’
4
ह्यास्तव परमेश्वर अहज्यास म्हणतो, “ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस; तू अवश्य मरशील.”’ असे बोलून एलीया चालता झाला.
5
जासूद राजाकडे परत गेले तेव्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्ही परत आलात ते का म्हणून?”
6
त्यांनी त्याला सांगितले, “एका मनुष्याने आम्हांला वाटेत गाठून सांगितले की, ‘ज्या राजाने तुम्हांला पाठवले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, परमेश्वर म्हणतो तू एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्न करायला माणसे पाठवली ती इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय? तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस, तू अवश्य मरशील.”’
7
त्याने त्यांना विचारले, “ज्या मनुष्याने तुम्हांला गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता?”
8
ते म्हणाले, “त्याच्या अंगात केसांचा झगा होता व त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता.” तो म्हणाला, “तो एलीया तिश्बीच.”
9
ह्यावर राजाने पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन एलीयाकडे पाठवले. एलीया होता तेथे जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो पर्वतशिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो त्याला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे की, ‘तू खाली उतरून ये.”’
10
एलीयाने त्या पन्नासांच्या नायकाला म्हटले, “मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले.
11
मग राजाने त्याच्याकडे पुन्हा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. तो जाऊन त्याला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘राजाज्ञा आहे की, ‘तू लवकर खाली उतरून ये.”’
12
एलीया त्याला म्हणाला, “मी देवाचा माणूस असेन तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले.
13
मग राजाने तिसर्यांदा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. ह्या तिसर्या पन्नासांच्या नायकाने जाऊन एलीयापुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, “हे देवाच्या माणसा, माझा प्राण व ह्या आपल्या पन्नास दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटोत.
14
पाहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले दोन नायक व त्यांचे पन्नास शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मोलवान वाटो.”
15
परमेश्वराचा देवदूत एलीयाला म्हणाला, “खाली उतरून त्याच्याबरोबर जा; भिऊ नकोस.” तेव्हा एलीया उठून खाली उतरून त्याच्याबरोबर राजाकडे गेला.
16
त्याने त्याला म्हटले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्न करायला तू जासूद पाठवलेस ते इस्राएलात देव नाही म्हणून की काय? ह्यास्तव ज्या बिछान्यावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस; तू अवश्य मरशील.”’
17
एलीयाने सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो मरण पावला. त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या जागी यहोराम हा राजा झाला. यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याचा पुत्र यहोराम ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी हे झाले.
18
अहज्याने केलेल्या बाकीच्या गोष्टींचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25